Bluepad | Bluepad
Bluepad
अधूनमधून दिसत असावं!
Deepak Thakur
Deepak Thakur
19th Sep, 2022

Share

पु लं देशपांडे यांच्या मैत्र ह्या कथा संग्रहात ,ग दि माडगुळकरान वर लिहिलेल्या लेखात एक सुंदर पण ह्रदय स्पर्शी प्रसंग इथे सांगून ह्या लेखाची सुरुवात करतो.त्यात बऱ्याच दिवसांनी पु लं ग दि मां कडे गेले होते त्यामुळे त्यांच्या वृद्धआई ने चटकन त्यांना ओळखले नाही म्हणून मग ग दि मांनी आईला त्यांची ओळख पटवून दिली, त्यावर ती माऊली म्हणाली "हे काय बरं?अधूनमधून दिसत असावं बाबा!" हे वाक्य माझ्या मनात कायम घर करून गेले आहे,कारण आताशा मित्र मंडळी, आप्तस्वकीय वरचेवर भेटत नाहीत. कार्यबाहुल्य म्हणा किंवा इतर ही कारणे असतील म्हणा आपण आपल्याच माणसानं पासून खूप दूर चाललो आहोत.हे हेतुपूर्वक होत नाही तर ते घडून जाते.रोज भेटलेच पाहिजे असे नाही पण आठवणीत कायम ठेवावे.उद्या कुणी बघितला आहे?असे आपण नेहमी म्हणत असतो आणि त्यामुळे आज जगून घेतले पाहिजे. आठवड्या पंधरा दिवसांत आम्ही शाळेतील वर्गमित्र भेटत असतो .दोन तीन तास मजेत घालवतो, त्यातील जास्तीत जास्त वेळ एकमेकांची टिंगल टवाळी करण्यात जातो.ती एनर्जी आम्हाला पुढील १५दिवसअक्षरशः जगवते. बरेच दिवस भेटलो नाही की चुकचुकल्या सारखं होतं, नेहमी हजर राहणारा एखादा गैरहजर असला तर चुटपूट लागते.अलीकडे मला व्हाट्सअप्प वर बऱ्याच मित्र मैत्रिणीना गूड मॉर्निंग मेसेज टाईप करून टाकायची सवय लागली आहे,माझ्या मते ते फक्त आणि फक्त माझे अस्तित्व ह्या जगात आहे किंवा मी क्षेमकुशल आहे हे दर्शवण्यासाठी साठी केलेली एक धडपड असते आणि ज्या वेळी त्याला उत्तर म्हणून त्यांच्या कडून जेंव्हा गुड मॉर्निग येते तेव्हा ती सर्व मंडळी कुशल असल्याचे समाधान मिळते.एक गम्मत सांगतो माझी एक राणी नावाची बहीण आहे जर तिला मी तिच्या गुड मॉर्निंग चे उत्तर दिले नाही तर पटकन फोन करून कानउघडणी करते.ती आपण एकमेकांची किती काळजी करतो ह्याचे प्रतीक आहे.त्यामुळे आपण एकमेकांना आपले अस्तित्व जाणवुन देत राहावे असे माझे प्रामाणिक मत आहे.विशेषतः करोना काळा नन्तर तर आपण सतत सम्पर्क ठेवून असलो पाहिजे कारण मध्यन्तरी बरेच सखे सोबती न परतीच्या प्रवासाला न भेटता निघून गेले आणि त्याची सल कायम राहील. त्यामुळेच आजचा लेखप्रपंच अधूनमधून दिसत असावं. माझी सर्वांना विनंती आहे , भेटा, मेसेज करा, फोन करून गप्पा मारा आणि कायम सम्पर्क ठेवत रहा कारण फक्त हे गाणे आठवा
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते...ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
म्हणून अधूनमधून दिसत असावं!
-दीपक ठाकूर-९८२३३५१५०५

181 

Share


Deepak Thakur
Written by
Deepak Thakur

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad