Bluepad | Bluepad
Bluepad
अध्याय जीवनाचा
कुलकर्णी दीपाली
19th Sep, 2022

Share

अध्याय जीवनाचा
नमन पहिले श्री गणराया 🙏
लिहिते अध्याय जीवनाचा ।।
बीज अंकुरता गर्भात
प्रथम अध्याय जीवाचा ।।
नवजात शिशु येता जगती
द्वितीय अध्याय जन्माचा ।।
रांगणे, चालणे, बोल ते बोबडे
तृतीय अध्याय वाढ़िचा ।।
वाचन, लिखाण अन समजण
चतुर्थ अध्याय आकालनाचा ।।
नोकरी, विवाह अन संसार
पंचम अध्याय जवाबदारिचा ।।
स्थिर - स्थावर अन समाधान
षष्टम अध्याय प्रौढ त्वाचा ।।
निवृत्ति वेळी गाठीशी अनुभव
सप्तम अध्याय वृद्धत्वाचा ।।
निरंतर जप, नाम
अष्टम अध्याय मुक्तिचा।।
सोसता कष्ट , अवहेलना
नवमं अध्याय हिशोबाचा ।।
चांगले मन ठेवता वृत्ति निस्वार्थ
दशमं अध्याय दखलीचा ।।
स्थिरावता आत्मा अन्तराळी
एकादशं अध्याय मोक्षाचा ।।।
होताच अंत जीवनाचा
त्रयोदश अध्याय समाप्तीचा।।
गोड़ मानूनी घ्यावे
विवेचन .. अध्याय जीवनाचा ।।
कुलदीपा

174 

Share


Written by
कुलकर्णी दीपाली

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad