Bluepad | Bluepad
Bluepad
.... माझे बाबा ....
Siddhesh Sawant
Siddhesh Sawant
19th Sep, 2022

Share

जीवनातील या सुख दुःखावर
नाही उरत जेव्हा मनाचा ताबा..
तेव्हाच आठवतात मज मला
माझ्या स्वप्नातील ते माझे बाबा...
आयुष्याच्या या वळणावरी मला
नेहमीच असते तुमची साथ
सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी
कायमच असतो तुमचा पाठीवर हात
दिवस रात्र कष्ट करुनी
तिन्ही सांजेला तो येई घरी
मनी घेऊनी फक्त एकच इच्छा
सुखी राहूदे ती माझी चिमुकली परी..
पायाला त्या पडलेल्या भेगा लपवत
गुपचुप ओसरीवर बसून राही
चिमुकले ते हात गाली पडता
वेदना साऱ्या तो विसरुनी जाई
स्वतःची स्वप्ने बाजूला ठेऊनी
कुटुंबासाठी नेहमी झटत राही..
आले किती ही मोठे टेन्शन तरी
चेहऱ्याने मात्र नेहमी हसत राही..
घाम गळूनी कष्ट करी सारे
नाही कसला कष्टाला त्यांच्या ताबा
स्वतच्या जीवाची पर्वा न करता
आमच्यासाठीच जगतात फक्त माझे बाबा..
आमच्यासाठीच जागतात फक्त माझे बाबा...

188 

Share


Siddhesh Sawant
Written by
Siddhesh Sawant

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad