Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग - सण आणि आम्ही
वंदना गवाणकर
19th Sep, 2022

Share

बाप्पा आले की सगळयात व्यस्त, गोंधळलेली, मनावर दडपण ठेऊन वावरणारी असते ती घरातली ' स्त्री '. सगळं सोवळ पाळून करायचं... माणसं किती, नैवेद्याचे काय? भाज्यांचं काय निवडणार कोण? कामवाली बाई रजा नाही ना घेणार? सर्वात महत्वाचं घरात आलेल्या बायका काही कामातली ' कमी' नाही ना काढणार? .....अनेक स्त्रिया ह्या दडपणा खालून जात असतात. अस म्हणतात ' बाईचं बाईची दुश्मन असते ' आपल्या घरी काहिही करेल पणं दुसरीने तेच करायला घेतलं की झालं ' आमच्याकडे ना आम्ही असं करतो....माझ्या सासूबाईंनी अस शिकवलेल, आमच्याकडे ना अस जेवणं बनतच नाही, सगळं साग्र संगीत लागतं.... वैगरे वैगरे....'
मागच्या वर्षी एकाकडे गणपतीला दर्शनाला गेलो, घर रिकामं वाटलं, थोड्या जून्या झालेल्या सूनबाईनी सांगितल ' मदतीला कोणी येत नाही, मग बोळवण कमीच केली... उगाचंच कशाला गर्दी.... नणंद, दीर, चुलते, त्यांची मुलं, तिचे सासु सासरे.... बाकीची लोकं? बाप्पा त्यांचा पणं आहे ना, पणं मदतीला कोणी येत नाही. सगळे भरजरी साड्या नेसून येणारं, खुर्चीवरून सोफ्यावर, सोफ्यारून खुर्चीवर, साधे पाणी प्यायला दिलेले ग्लास पण उचलून आणत नाहित, हल्ली तर ते प्लॅस्टिक ग्लास असतात, धक्का लागला की झालं, पुढची साफसफाई....
सूनबाई पुढे म्हणाल्या, ' मी घरातल्यांना समजावलं तुम्हाला जमतंय का करायला....नाही ना मग जे मी करतेय ते असेच असणारं.... स्विकार करा, मग त्रास होणारं नाही. माझ्या सासूबाई आणीं सासरे ह्यांना जरा वाईट वाटलं, असे कसे लोकांना बंद करणार, इतकी वर्ष कधी झाल नाहीं, मग ? .....मी सांगितलं ' इतकी वर्ष करायला भरपुर माणसं होती, तेव्हा घरातल्या आठ बायका चाळीस पन्नास जणांचा स्वयंपाक करतं होत्या, सगळी कामं वाटून घेतली जात होती, आता तसं नाहीय, ही करतेय मग करू दे, विचारलं तर कामाला लागायचं नाहितर नाही....असे विचार करुन येतात....मनापासून नाही करतं. किती सतत बोलावत राहणार? मग हळू हळू कमी करायचं. बाहेरून जेवणाची व्यवस्था केली तरी घरात नैवेद्याचे करावच लागतं....हे सगळं आता जमतंय.... उद्याचं काय? तेव्हा आतापासूनच सुरूवात करायची, सगळं कमी करायला '.
सूनबाई खरंतर मनापासून खरं बोलल्या....काय होत ना सणासुदीला घरातली बाई एवढी सगळ्या कामात ( साफसफाई, माळ्यावराची भांडी घासायची पासून जेवणाचे मेनू त्याची तयारी पर्यंत) अडकवून घेते, की जेव्हा सण चालु होतो तेव्हा ती खरी थकलेली असते, टेन्शन मध्ये असते, सण संपले की नक्किच शरीराने आणि मनाने पणं आजारी पडते. फॉरेन मध्ये ना बऱ्याच सिरियल किंवा सिनेमात असा दाखवतात की नवरा बायको दोघंही किचन मध्ये समसमान काम करत असतात, तो कधी भांडी घासतो, कधी कचरा काढतो, एक दोन जास्तीच्या डिश सहजच बनवतो, मुलांचं करतो..... पणं आपल्या इकडे एकविसाव्या शतकात पणं ही कामं कोण करतं हे तुम्हाला माहिती आहेच.....मग तिने जेव्हा हे सर्व कमी करायचं.....असा निर्णय घेतला तर वाईट काय आहे?
माझ्या साऊथ इंडियन मैत्रीणीने गणपतीला बोलावलेलं, छान साडी, दागिने घालून हसतमुखाने स्वागत केलं आमचं, मला जरा आश्चर्य वाटले, तिने सांगितलं तिच्या मुलांसाठी म्हणून घरात गणपती बाप्पा विराजमान झाले, पणं सकाळी उठून प्रसादाचा शिरा, नाश्ता पासून येणाऱ्या लोकांना चिवडा लाडू, असे सगळं माझा नवरा बनवतो, जेवणाच मी करते, decoration मुलं करतात, आणि साफसफाई, कपडे मशीन लावून वाळत घालण्याची ही काम मुलांना शिकावलित, ते ती पार पाडतात. मी तशी खुप फ्रेश असते, नटते, नविन साड्या नेसते, दागिने घालते..... बरच काही. मला वाटतं जेंव्हा असं बाँडींग घरात असतं तेव्हा घरात खरे आनंदाने सण साजरे होतात, कारणं घराची लक्ष्मी प्रसन्न असते. नुसते सण आहे म्हणून साजरे करायचे का आनंदाने साजरे करायचे .......आपल्या हातात.
मगं आपण कधीपासून सुरूवात करायची....आपणच ठरवायचे.
🙏 वंदना ❤️

230 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad