Bluepad | Bluepad
Bluepad
सायंकाळची शोभा ..
हर्षला अनंत महाजन
19th Sep, 2022

Share

सायंकाळची शोभा ..
सायंकाळची शोभा ..
मी काही निसर्गाची फार मोठी चाहती नाही; पण सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी आकाशात होणारी रंगांची उधळण बघून आपली बोटे नकळत कॅमेऱ्यावर स्थिरावतात. तसंच काहीसं माझं ही होतं स्वाभाविकच आहे.
रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी चालायला जाते आणि मावळत्या दिनकराचे मनसोक्त दर्शन घेते. सध्या तर आकाशात रविराजाचा नि ढगांचा मस्त लपंडाव सुरू असतो. तो पाहताना चालणं तर मी विसरूनच जाते. अवकाशात पसरलेल्या रंगांच्या छटा बघून असं वाटतं की जणू एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून रंग सांडला आहे. इतक्या मनमोहक छटा असतात त्या की त्यात हरवून जायला होतं. हे सर्व बघत असताना बाकी साऱ्या गोष्टींचा विसर पडतो.
 सूर्यास्त होताना सूर्याचे ते रूप आणि आकाशाचा तो रंग नेहमी डोळ्यांमध्ये साठवून ठेवावासा वाटत असतो. पावसाळा जवळ आल्याने अवकाशात येणाऱ्या ढगांमुळे तर सूर्यास्ताच्यावेळी तर विहंगम दृश्य असतं.
सायंकाळची शोभा ..
सायंकाळची शोभा ..
आकाशाच्या कॅनव्हासवर रंगाचा खेळ.
हीच ती शांत संध्याकाळची वेळ.
अथांग पसरलेले खळाळते पाणी
काळ्याभोर वाळुवर खेळ मांडी काेणी.
वरील शब्दांतून किती समर्पक वर्णन केलं आहे सायंकाळचं. अशा कितीतरी सायंकाळच्या वातावरणाचे फोटो मी काढले आहेत. मी नक्की सूर्याचा खेळ बघायला जाते की फिरायला असा प्रश्न नक्कीच पडणारा आहे. सूर्य अस्ताला गेल्यावर आकाशातील रंगांचा खेळ संपला की मी घरी जाते. दिवसभराची सगळी मरगळ निघून जाते ही सांयकाळची शोभा बघून; एक नवीन enargy मिळते.
©हर्षला महाजन.

170 

Share


Written by
हर्षला अनंत महाजन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad