Bluepad | Bluepad
Bluepad
खीरीचा गोडवा😋
Ankita Tirlotkar
Ankita Tirlotkar
19th Sep, 2022

Share

बदाम,पिस्ता, काजू
आज कुजबुजत होते
आणलंय एकत्र आम्हांला
म्हणजे गोड बनतंय सणाला....
भांड्यांचा आवाज नाही झाला जास्त,
नुसतीच कढई,पलीता एकमेकांत तटस्थ
दुधाचं पातेलं थोडं गरमच होतं,
नुकत्याच धापा टाकत होतं.....
सर्रकन कढईत तुप गेलं,
गरम गरम होत रव्यालाही बोलावलं
एकमेकांत मिसळत त्यांनी,
दुधालाही आमंत्रण पाठवलं.....
जवळजवळ उकळ्या येऊ लागल्या,
सुगरणीचा हात साखरेच्या डब्यात गेला
गोडावलेली साखर अलगद विरघळली,
झाकण ठेवून सुगंध लपवायला लागली....
बारी आता त्या बदाम, पिस्ता, काजूची,
छानपैकी मिसळून खीर तयार झाली
विस्कटलेल्या कुटुंबाला ती,
गोडवा देऊन गेली........

189 

Share


Ankita Tirlotkar
Written by
Ankita Tirlotkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad