Bluepad | Bluepad
Bluepad
चक्रव्यूह
S
Sanjana Kamat
19th Sep, 2022

Share

देह नास्तिक विसरे
नाम घेण्या भगवंत
भोगी दुःखाचा डोंगर
मोह माया झुलवत
पोट भरण्याचा शोक
कर्म बुध्दी आकुंचित
ज्ञान हीन मांस गोळा
पाप कर्म संचलित
लोभ भ्रांती चर्मकुंडी
उभा हाडांचा सापळा
भरे नरक कोठार
चक्रव्यूह तो आगळा
जन्म घेण्या विनवितो
सोहं गर्भात म्हणत
भुलथापा हेलकावे
कसा होशील विरक्त
जाता शरण देवास
जन्म मरण चुकत
तुच कस्तुरी सुगंध
जाग अंतरी शोधत
श्रीमती संजना कामत (मुंबई)

139 

Share


S
Written by
Sanjana Kamat

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad