Bluepad | Bluepad
Bluepad
माया केअर फाउंडेशन च्या वतीने जेष्ठ नागरिकांनसाठी विनामूल्य मदत सुविधा
गावं कट्टा
गावं कट्टा
19th Sep, 2022

Share

माया केअर फाउंडेशन च्या वतीने जेष्ठ नागरिकांनसाठी विनामूल्य मदत सुविधा
माया केअर फाउंडेशन च्या वतीने जेष्ठ नागरिकांनसाठी विनामूल्य मदत सुविधा
गरजू ज्येष्ठ नागरिकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधावा. .अभिजीत माळी
समन्वयक ( महाराष्ट्र राज्य)
अकोला:- सेवा भाव जोपासत माया केअर फाऊडेशन द्वारे अकोला जिल्ह्यातील गरजू जेष्ठ नागरिकांना विनामूल्य मदत करण्यात येत आहे. गेल्या 13 वर्षा पासून ही संस्था काम करत असून , सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक, बौद्धिक, ने-आन करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते. ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात. यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेच्या कामात मदत करणे ,शासकीय कामात मदत करणे ,दुकानातून औषधे आणून देणे ,त्यांच्यासोबत बागेत फेरफटका मारणे, व्हिडिओ कॉल करण्यासाठी मदत करणे ,त्यांच्यासाठी लिहिणे -वाचणे मनोरंजनात्मक खेळ खेळणे तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे यासह अनेक प्रकारची मदत विश्वासू स्वयंसेवकाच्या द्वारे पूर्णपणे मोफत केली जाते. सध्या ही संस्था भारताच्या 47 शहरांमध्ये व इंग्लड (UK)च्या 5 शहरांमध्ये काम करते. या संस्थेचे मागील कामकाज 100 पेक्षा जास्त बिंदू समूहातील दिव्यांग व्यक्ती आपल्या घरी बसून काम करत आहे.
माया केअर फाउंडेशन च्या वतीने जेष्ठ नागरिकांनसाठी विनामूल्य मदत सुविधा
त्यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध होत आहे व तेही आत्मनिर्भर बनत आहेत. या संस्थेच्या मार्फत आतापर्यंत ज्येष्ठांना 13000 पेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे.वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या घरात व वृद्धाश्रमात सहाय्यक आयुष्यात स्वतंत्र आनंदी आणि सोयस्कर जीवन जगण्यासाठी सक्षम बनविणे आणि दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनविण्यासाठी त्यांच्याकडून स्वतःच्या घरातून काम करून घेऊन स्वावलंबी व्यवसायिक बनविण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जगातील प्रत्येक शहरातील जेष्ठांना ही सुविधा मोफत मिळावी व तेथील दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा या दिशेने संस्थेचे कामकाज सुरू आहे. आपणासही अशा प्रकारची मदत हवी असल्यास 9552510400/11 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिजीत माळी व
अकोला जिल्हा समन्वयक अनिल डिवरे,अर्चना जोशी यांनी केले आहे.

184 

Share


गावं कट्टा
Written by
गावं कट्टा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad