Bluepad | Bluepad
Bluepad
पृथ्वीवरचं स्वर्ग...
Nishu💞
Nishu💞
19th Sep, 2022

Share

संवाद एवढा हळू व्हायला हवा, जणू
वाऱ्याची झुळूक ही नाजूकपणे गाणी गुणगुणत असावी.
वय न वाढू देता ते कमी करा,
रफ रजिस्टरच्या त्या शेवटच्या पानावर
खोडलेल्या त्या नावांसोबत
पूर्ण झालेल्या त्या कहाणीसोबत.
जिथं माणसाला मनसोक्तपणाने रडता यावं
असा एक कोपरा प्रत्येक घरात असायलाच हवा.
हास्य हे आपलं Identity card असायला हवं
आणि दुःख आपला Secret Password.
पुस्तकात लिहिलेले सर्वकाही सत्यात यावं आणि
वर्तमानपत्राऐवजी दररोज सकाळी एक कोरं पानं
घरात यायला हवं, ज्यामध्ये आपण
गेलेल्या दिवसांच्या आठवणी लिहू.
आपलं हे जग तसं नको बनायला हवं
जसे की हे बनत आहे,
उलट हे एवढं चांगलं बनायला हवं
जेणेकरून दुसऱ्या जगातील लोकांना
आपलं जग हे स्वर्ग वाटावं...

176 

Share


Nishu💞
Written by
Nishu💞

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad