Bluepad | Bluepad
Bluepad
शहाणपण
अपर्णा
अपर्णा
19th Sep, 2022

Share

आयुष सरळ मार्गी कुणाचच नसतं इथे वर वर सगळं चांगलं दिसत असलं तरी प्रत्येकाला टोचणारं असं काहीना काहीतरी असतच जे कदाचित कुणी व्यक्त करत नाही किंवा केलं तरी ते कुणी समजून घेत नाही.
समजून घेणाराही त्या परिस्थिती मदत करण्यासाठी आणि मदत घेणारा ती स्वीकारण्यासाठी हतबल असू शकतो, असे हे किचकट प्रकार सगळ्यांच्याच आयुष्यात असावेत "कदाचित".
मीही अशीच पडत, झडत, सावरत प्रवास करतच होते "आयुष्याचा" अशातच ट्रॅक चेंज झाला.
ह्या ट्रॅक वर चालताना मस्त धुंद होऊन पुढे पुढे जात राहिले, स्वतःत झालेले बदल लक्षात येण्या आधी प्रवास फार पुढे गेला होता, स्वतःला बिनधास्त, स्ट्रॉंग बनवता बनवता मी माझ्यातलं साधेपण, मनाचा निरागसपणा कधी कुठे हरवून बसले मला समजलंच नाही, आणि हातात आलं एक *शहाणपण*. हे शहाणपण मला फक्त स्वार्थ शिकवत. स्वतःच सुख कशात आणि ते कसं मिळवता येईल हे शिकवत.
पण असं हे मानाचं झालेलं नुकसान भरून काढता येत नाही, किंतीही ठरवलं तरी हे हरवलेलं निरागस साधेपण पुन्हा तसच परत मिळवता येत नाही.
" प्रवासात आयुष्याच्या,एक असा ट्रॅक येतो
निरागसता,भोळेपणा सोडून,जेव्हा आपण
शहाणपण स्वीकारतो........
सुख आणि सुखचं, स्वार्थ फक्त साधत राहतो.
मानाचं हे होणारं नुकसान, अनाहुत पणे बघत राहतो
बदललेला हा ट्रॅक, संपूर्ण आयुष्यावर भारी पडतो"
अपर्णा❤️

178 

Share


अपर्णा
Written by
अपर्णा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad