शरदाच चांदणं
कुणाचं तरी बोट पकडताना कुणाच तरी बोट निसटणारच.
दुःख उगाळणारी वेदनेची सहाण वापरायचीच कशाला.त्याच्यापेक्षा
सुगंधित आठवणीची उदबत्ती लावा ज्याच्यामुळे भवताल थोडा वेळ तरी सुखावून निघेल.
परोपकार करायचाच असेल तर प्राजक्ताच्या सड्या प्रमाणे दुसऱ्याच्या अंगणात थोडा सुखाचा सडा शिंपायला शिका.
कारण जेवढा द्वेष कराल तेवढं कापरा सारखे संपाल.
आसमंत उजळवूनच टाकायचा असेल तर शरदाचं चांदणं व्हां.
डॉ.अनिल कुलकर्णी