Bluepadध्येयवेडा 'विश्वास'!!
Bluepad

ध्येयवेडा 'विश्वास'!!

K
Komal Khambe
21st Apr, 2020

Share

IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं 'मन में है विश्वास' हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचनात आलं. Quarantine च्या काळात असं पुस्तक हाती लागणं म्हणजे पर्वणीच!!
IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं 'मन में है विश्वास' हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचनात आलं. Quarantine च्या काळात असं पुस्तक हाती लागणं म्हणजे पर्वणीच!! IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं 'मन में है विश्वास' हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचनात आलं. Quarantine च्या काळात असं पुस्तक हाती लागणं म्हणजे पर्वणीच!!
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 'कोकरूड' या छोट्याशा गावात जन्मलेल्या मराठमोळ्या 'विश्वास' ने दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी लढलेली पानिपतची लढाई आणि दिलेली यशस्वी झुंज म्हणजे 'मन में है विश्वास'. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या २०४ पानी पुस्तकातून लेखकाने बालपणापासून ते IPS होण्यापर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने मांडला आहे. हे एक आत्मचरित्र असलं तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी अनुभव स्वरूपात लिहिले गेलेले पुस्तक आहे. एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांची संपूर्ण आेळख, अभ्यासक्रमात झालेला बदल, पेपरचा बदललेला पॅटर्न याबाबत योग्य मार्गदर्शन केलेले आहे. स्पर्धापरिक्षांत आलेले अपयश, ऐन तारुण्यात काही वेळा रुळावरून घसरलेली गाडी अशा निराशाजनक परिस्थितीत अंधारातून उजेडाकडचा प्रवास करत स्पर्धापरिक्षांचं चक्रव्यूह भेदताना लेखकाच्या रूपात महाभारतातील अभिमन्यू आपल्यासमोर उभा राहतो. २६/११ च्या हल्ल्यात लेखकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन अंगावर शहारे उभे करतं.
लेखकाने भूतकाळातील एखादी गोष्ट सांगताना त्याचा भविष्यात कसा उपयोग झाला, याची यथाकथित उदाहरणे मांडलेली आहेत. प्रसंगाचे दाखले देताना लेखकाने त्याच्या वडिलांच्या पिढीतील, त्याच्या पिढीतील आणि त्याच्या मुलाच्या पिढीतील विचारांचा आणि बदलेल्या परिस्थितीचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला दिसतो. स्पर्धा परीक्षा दरम्यान विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करताना किंवा डयुटीवर असताना आलेले अनुभव रेखाटताना लेखकाने महिला सक्षमीकरण, तरूण पिढीभोवती असलेला ड्रग्सचा विळखा, त्याच्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या,व्यसनाधीनता, पौगंडावस्थेतील प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांना देखील हात घातला आहे. कवी कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांच्या ओळी, संस्कृत स्रोत, मराठी व इंग्रजी म्हणी यांचा यथोच्छित वापर केलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा लेखकावर आहे , हे पुस्तक वाचताना वेळोवेळी जाणवते. वाचन, लेखन याचप्रकारे बाॅलिवूडच्या सिनेमांचेही वेड परंतु इतर गोष्टीप्रमाणेच सिनेमा बघण्याचीही दृष्टी लेखकाला अवगत आहे, हे त्यांनी केलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाच्या दोन ओळींच्या विश्लेषणातून स्पष्ट होते. जीवनातील प्रसंग आणि असलेली छायाचित्रे यामुळे पुस्तकाला मनोरंजक केलं आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ कमालीचे बोलके आहे. मुखपृष्ठावरील त्यांच्या छायाचित्रातील डोळ्यांतूनच त्यांचा स्वतःवर असलेला 'विश्वास' प्रकर्षाने जाणवतो. मुलाला लाल दिव्याच्या गाडीतून फिरताना पाहण्याचं वडिलांचं वेड स्वप्न पूर्ण करू पाहणारा मुलगा, आपल्या मुलीत आपल्या बहिणीला पाहणारा आणि बहिणीला जे देता नाही आलं ते मुलीला देऊ पाहणारा हळवा बाप आणि भाऊही पुस्तक वाचताना आपल्यासमोर उभा राहतो. चांगल्या आरोग्यासाठी फिटनेसचं धडे आणि महत्त्व ही लेखकाने वेळोवेळी पटवून दिले आहे.
'If you fail to plan, You plan to fail..!!' पुस्तकातील या वाक्याप्रमाणेच पुस्तकाचे यश आहे. पुस्तक उत्तम नियोजन करून लिहिल्यामुळे, पुस्तक कुठेही fail गेलेलं नाही. एम्. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी ची आेळख जरी करून देणारे असलं तरी प्रत्येकाने वाचावं असंच आहे. पुस्तक वाचून प्रेरणा तर मिळतेच पण स्वत:बद्दल 'विश्वास' निर्माण करण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते.


1 

Share


K
Written by
Komal Khambe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad