Bluepad | Bluepad
Bluepad
एक दिवसांचा पगार "
Sohan Jadhav  " Sachu "
Sohan Jadhav " Sachu "
15th Jun, 2020

Share

२००९ ची साधारण ही गोष्ट .

रविवार असल्यामुळे शाळेला व क्लास ला सुट्टी होती सचिन सचिन जाधव. सचिन ६ वीत शिकत होता त्याच कुटुंब तस श्रीमंत होत त्याला हवी ती गोष्ट भेटत असे . सचिन घरात सर्वांत लहान होता त्याला मोठी,बहीण व भाऊ होते. अमिश व भाग्यश्री . तो सर्वांचा लाडका होता. त्याच घर त्याच्या मामाच्या बाजुलाच होत त्यामुळे तो सारखा तिकडेच खेळायला व जेवायला जात असे.

रविवार होता सचिन घरात होता. त्याचे भाऊ-बहीण काहीतरी कामासाठी त्याच्या बाबासोबत बाहेर गेले होते. घरात फक्त तो आणि त्याची आई होती . सचिन ला ५ नंतर खेळायला जायचं होत. पण त्याला घरात बसून त्याला खुप कंटाळा येत होता.  त्याच वेळेस त्याच्या दारावरची बेल वाजली व त्याच्या आईने दार उघडले तसा त्याचा मिञ धावतच त्याच्या खोलीत  आला व त्याला बोलला " चल आपल्याला एक काम आहे ! येऊ आपण दुपारी २ पर्यंत " सचिन ने आईला सांगतिल की तो खेळायला जात आहे. बोलून तो त्याच मिञ अमित सोबत बाहेर आला.
अमित त्याला घेऊन एका दुकानात गेला. तिकडे त्याचा मिञ राहुल होता राहुल पण सचिन सुध्दा त्याला ओळखत होता. ते दुकान नवीन नवीन त्या ठिकाणी उघडल होत. सचिन ते दुकान पाहिल की चांगल होत" ब्युटी प्रॉडक्ट्स " च दुकान होत तिकडे सर्व महिलांच " ब्युटी प्रॉडक्ट्स " भेटणार होते.
त्या दुकानांच्या मालकांनी तिघांना बोलवलं व तो राहुलला बोलला " तुझे मिञ नक्की काम करतील ना ? राहुल - हो साहेब करतील ! मिञ आहेत माझे करतील ते काम !
मालक - ठिक आहे ! तुम्हाला आमच्या दुकानाची जाहिरात करायची आहे व त्यासाठी ही जाहिरात पेपर (pamphlet) आहे हे तुम्हाला प्रत्येक घरात जाऊन द्यायची आहे. सचिन राहुल ला अरेरे ! काय आहे हे आपल्या काम करायचं आहे ! अरे घरी समजलं तर ?
राहुल - काही नाही होणार रे मी आहे तु नको घेऊ काळजी ! सचिन - ठीक आहे ! तु आहेस म्हणून करू हे काम ☺ अमित - अरेरे ! घाबरू नको सचू मी व राहुल या आधी पण हे काम केल आहे ! आम्ही आहोत
सचिन - ठिक आहे पण कोणाला समजल नाही पाहिजे खास करून दादा - ताई ला अमित - हो रे बाबा ! आता त्याच्याशी बोलू जरा !
बोलून ते तिघे मालका कडून ती कागदे घेतली. मालक त्यांना बोलला नीट पोहचवा सर्वांकडे व लवकरात लवकर ते काम करा !
अमित व राहुल गरीब असल्यामुळे ते लोक दर रविवारचे काम करुन घरच्यांची मदत करत असे.पण सचिन श्रीमंत असल्यामुळे तो ते काम पहिल्यांदा करायला जाणार होता.
सचिन,अमित,राहुल तिघांकडे जाहिरात ची कागदे होती . राहुल सचिन ला  बोलला तु तुझ्या बाजूच्या इमारती व त्याच्या पुढे इमारती आहेत तिकडे देऊन ये ! अमित तु तुझ्या इमारतीत व मागे असल्याला चाळीच्या ठिकाणी दे व मी सचिन च्या इमारतीत व चाळीत देतो. राहुल दोघांना समजवून तिकडून सचिन च्या इमारतीत जाऊ लागला. सचिन पण ती जाहिरात ची कागद इमारती मध्ये एक एक घरात जाऊन देऊ लागला व स्वता:हाशी बोलला " काम करायच कधी अवघड काम आहे राव , आणि मला दया येत आहे की रोज आमच्या घराचा पेपरवाला न चुकता पेपर टाकतो पूर्ण आमच्या इमारतीमध्ये  व बाजूच्या इमारतीत ! त्याला व त्याच्या सोबत काम करण्याना किती ञास होत असेल ना ! माझे तर आतापासूनच पाय दुखत आहे " बोलून सचिन खूप मन लावून ते काम करत होता. काम करता त्याला त्याच्या ताईचे मैञीणी मिञ भेटत होते. पण ते सुध्दा त्याला काम करताना पाहून खूष होते.
म्हणता म्हणता सचिन नी सर्व जाहिरातील कागदे प्रत्येक घरात देऊन आला होता . राहुल व अमित नी पण ते काम संपवल होत. तिघे एकञ जमले व  सचिन ला बोलला " मग कसं वाटल काम करून ? सचिन - मजा आली ! व मला समजल की छोटस छोटस काम करण्यात पण खूप मेहनत लागते व ती मेहनत काय असते ते मी आज केल आहे ! राहुल ,अमित - मस्त ! चल जाऊ आता त्या दुकानात त्या मालकांना सांगायला की आम्ही आमच काम केल आहे ! सचिन - हो चल जाऊ लवकर ! २ वाजायला २० मिनिट आहेत अजून ! अमित - हो चल जाऊ लवकर !
तिघे जण दुकानांत येऊन सांगतिल की ते काम आमच झाल आहे . त्यावर तो मालक बोलला शाब्बास ! व त्यांनी काही जणांना कॉल केला व सर्वीकडून उत्तर भेटल की हो ते भेटल आम्हाला !  मालक राहुल,सचिन,अमित जवळ बोलवून घेतलं व आपल्या पाकीट मधून पैसे काढून १००,१००,१०० रूपये असे तिघांना दिले. सचिन खूप खूष होता. कारण त्यांनी पहिल्यांदा काम करून पैसे भेटले होते ते पण मेहनत करून . मालक राहुल ला बोलला की तुझ्या मिञांनी मस्त काम केलं आहे व काम असेल तर बोलवून घेऊन मी तुम्हा लोकांना बोलून मालकांने तिघांना चॉकलेट्स दिले 🍬🍬🍬
राहुल,सचिन,अमित बाहेर आले होते . सचिन सारखा सारखा त्याच्या मेहनतीने कमावल्या पैशांकडे बघत होता.अमित व राहुल त्याचा निरोप घेऊन संध्याकाळी जायच आहे खेळायला बोलून आपआपल्या घरी निघून गेले. सचिन घरी येताच त्यांनी आपले कमवले से पैसे आई ला दाखवू लागला व नाचत होता. 🕺🏻 त्यांच्या आईने त्याला त्या पैशांतून चॉकलेट आजीसाठी व पान आणायला सांगतिल. चॉकलेट हे त्याच्या आई साठी. सचिन ची आई मनातच बोलली " काय आहे माझ लेकरू !  १०० रुपये भेटून पण त्याला किती आनंद आहे , असाच आनंद त्याच्या जीवनात राहू दे " बोलून सचिन साठी जेवन घ्यायला किचन मध्ये गेल्या. सचिन ने परत येऊन आई साठी चॉकलेट व आजीसाठी पान. उरलेले पैसे त्यांनी आपल्या " piggy bag "मध्ये टाकून दिल्या.
सचिन आपल्या आईला चॉकलेट दिल व मामाकडे जाऊन त्याच्या आजीला पान देऊन आला. सचिन परत येऊन जेवून , काम करून दमल्यामुळे झोपी गेला त्याच्या बेडरुम मध्ये काही मिनिटानंतर त्याचे बाबा व ताई व दादा आले. त्याच्या बाबांनी त्याच्या साठी खायला आणंल होत. आई बोलली की तो खूप दमल्यामुळे झोपला आहे. व सर्व काही सांगून टाकलं त्यावर त्याचे बाबा बोलले " मस्तच ! पण लहान आहे तो अजून एवढ्याशा जीवाने हे काम केल आहे. तसचं बाकीचे लहान मुल आहेत ते पण हे काम करत आहेत व ते गरीब आहेत . व ते गरीबी मुळे काम करत आहेत ! बालकामगार मानलं पाहिजे . अशा मुलांना पण सरकारची बंदी असून सुध्दा काम करत आहेत गरीब मुलं "बोलून सर्व जण सचिनच्या रूम मध्ये गेले .
भाग्यश्री ने त्याच्या डोक्यावर किस  करून तिच्या बाबांना सांगतिल की आपण सचू च्या वाढदिवसादिवशी गरीब मुलांना कपडे,खेळणी देऊ व ते पण प्रत्येक महिन्यात देऊ . भाग्यश्री ची ती कल्पना सर्वांना पटली होती.व सचिनच्या वाढदिवसा दिवशी पासून हे सुरू होणार होत.
सचिन नी फक्त काम केल होत व पण त्यामुळे तो खुष होताच पण घरच्यांनी उचलेल पाऊल गरीब मुलांची मदत करण्यासाठी त्यामुळे तो दिवस च खूपच चांगला होता. व तो १ दिवसांचा पगार खूप गोष्टी बदलणार होता.
व सर्वांना आपल्या पहिल्या पगारची आठवण करून देईल.
समाप्त !
( All rights reserve to me 😂😎 )
PC :- pexels.com
तर या कथेवर  शॉर्ट फिल्म आली तर किती मजा येईल ना. and this short story 😍😘😘 खुप जवळची आहे. मुड ऑफ झाला कि हि कथा वाचतो. एवढी छान वाटते मला. And परत शेअर केली इकडे. 🤗😇
Stay tuned ! Stay safe !
$@Çhū 😎

20 

Share


Sohan Jadhav  " Sachu "
Written by
Sohan Jadhav " Sachu "

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad