Bluepad | Bluepad
Bluepad
नाणं...!
Hemant Dinkar Sawale
Hemant Dinkar Sawale
15th Jun, 2020

Share

#नाणं...!

नाण्याला असलेल्या दोन्ही बाजू ह्या
आपणचं घडवल्या आहेत आपल्याचं सोयीसाठी
त्याचे नामकरण आपणचं केले
आणि आपणचं काढून घेतला अर्थबोध
त्याचे बाजारमूल्य आपणचं ठरवले
आणि आपणचं तयार केली त्याची चलन पध्दती

प्रचलित झालेल्या याच नाणे व्यवस्थेने
मोठमोठ्या सत्ता उलथून लावल्या
मोठमोठ्या सत्ता काबीजही केल्या

याच नाण्याने जमिनीची धूळही पाहली आणि
आभाळाच्या नक्षी कमानीवर अधिसत्ताही गाजवली
त्याने उभा केला मित्र पक्ष जो त्याच्याच बाजूने लढत राहील दिवस-रात्र
याच हव्यासापोटी त्याने शत्रुपक्षही घडवला
जो त्याच्याचं विरोधातही लढला, लढत आहे

नाण्याने उभे केलेले चारही मडके
सत्ता आणि संघर्षाच्या मधल्या धाग्यात प्रस्थापित झाले
मग विस्थापित कोणतं मडकं राहिलं
हे त्या नाण्यालाचं माहिती असेल ?

गुप्त धनाचं नाणं जमिनीतचं गाडल्या गेलं
आणि काळ्या धणाचं नाणं फोफावलं अपरंपार

याचं वेळी एकाचं नाण्याच्या दोन्ही बाजू आल्या समोरा समोर
कोणता चेहरा आपला आणि कोणता परका
हे नाण्याला कळलचं नाही
म्हणुनच त्याने आत्मसाद केले दोन्ही चेहरे....!

#हेमंत_दिनकर_सावळे
7875173828

6 

Share


Hemant Dinkar Sawale
Written by
Hemant Dinkar Sawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad