Bluepad" स " चे सप्तरंग भाग २
Bluepad

" स " चे सप्तरंग भाग २

मर्मस्पर्शी जीवन
मर्मस्पर्शी जीवन
15th Jun, 2020

Share

माझ्या स्व अनुभवातुन लिहीलेला पहिल्या भागाला म्हणजे " स चे सप्तरंग " याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी मुळे व आपल्या प्रतिक्रियासाठी ( comment) मी प्रथमतः तुमचे आभार मानतो. व आज हा दुसरा भाग प्रकाशित करत आहे . आणि ज्या कोणाचा पहिला भाग वाचण्याचा राहिला असेल तर नक्की वाचा. कारण हे दोन्ही भाग एकमेकांशी गुंफलेले आहेत ." स " तुमच्या आमच्या जीवनात काय अमुल्य बदल आणतो हे पहिल्या भागात आहेत त्याचा परिमाण, ताकद काय आहे हे जाणून घेतले . मला विश्वास आहे की तुम्ही पहिल्या सात " स " वर काही तरी अवलंब केला असेलच. आज या भागत अजून सात " स " समोर येतील, पण हे सात " स " आपल्या नसावे. जर हे सात " स " नसतील तर यशाची शिखरे आपण सहज पार करु व सामाजिकभान राखण्यास जरुर मदत करेल ......

• पहिला " स " हा जर टाळता आला तर आपण फार पुढे जाऊ शकतो कोणत्याही क्षेत्रात. सूड ( बदला) जिथे कुठे वाद विवाद आहेत, मत भेद आहेत, गर्व आहे . तिथे शंभर टक्के सूड बुद्धी असते व ती फार मानवाला खाली खेचते व आपल्या हातातून जे नको ते घडवून घेते. हा " स " प्रत्येका मध्ये थोड्याफार कमी जास्त प्रमाणात असतोच. पण त्याचा अतिउद्रेक पण होता कामा नये

• दुसरा " स " हा जरा गंमतीदार " स " आहे या वर एका " स " पोलिस खात फार जोर देत. संशय होय संशय. हा संशय पत्नीचा पति वर असतो की आमचे हे बाहेर काही कार्यक्रम तर करून नाही आले ना ! आई वडीलाचा मुलांनवर की काही चुकच करत नाही आहे ना . वाईट संगती सवयी लागत तर नाही ना, पोलिसाचा कुख्यात गुन्हेगारावर, चोरट्यावर संशय असतो एखादी मोठी घटना घडली की संशयित आरोपी म्हणून जेलची हवा खावी लागते. एक फार सुंदर मराठी संगीत नाटक पण आहे यावर संशय कल्लोळ . म्हणून म्हणतात संशयाच्या आजाराला औषध नाही पण तो संशय बाळगणे की न बाळगणे आपल्यावर असते....

• तिसरा " स " हा " स " जरा व्यक्तिगत विचारधारेतून विसरा तरच पथ्यावर पडेल. एक उदाहरण देवून हा " स " आपल्यात नसावा हे समजेल नरवीर तानाजी मालुसरे यांनी पहिला घरातील रायबाच्या लग्नाचा विचार केला नाही, तर स्वराज्याचा केला. रयतेचा केला. महत्वाचा म्हणजे महाराजाच्या शब्दाचा. स्वार्थ हा तिसरा " स " आहे कृपा करुन आपण हा कमी करण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा अमुलाग्र बदल या भारत देशात होईल. हे वाक्या माझ्या लहानपणा पासून ऐकत आहे. " देवा सगळ्यांच भल कर मात्र सुरुवात माझ्या पासून कर " ! यातही देवाकडे काही मागताना स्वार्थ दिसला.

• चौथा " स " हा स स्त्री यांन मध्ये जरा दिसतो. आणि तो दैनंदिन प्रसारित होणा-या मालिकतून फार मोठ्या प्रमाणात दाखवला जातोच. तो म्हणजे सोशिकपण स्त्री म्हटली की अबला तिला फार काही समजत नाही वगैरे वगैरे हा गोड गैर समज व ही धारणा समाज मनात अजूनही आहे. जरी एकवीसावे शतक चालू असेल तरी सोशिकता काही थांबली नाही . आज पण अत्याचार, बलत्कार, अन्याय, जातीभेद आहेच. हा " स " पहिला माराला पाहिजेल. स्मार्ट फोन आला 5G चा काळ आहे पण या स्मार्ट युगाच्या काळात माठ युग वाढत आहे .

• पाचवा " स " हा " स " सुद्धा विचारधारेवर अवलंबून आहे तो म्हणजे संकुचित मानसिकता/ विचारसरणी आपल ते भारी दुस-याच ते खराब, मी बोलतो तेच योग्य आहे. या संकुचित मानसिकतेचा सर्वता जास्त प्रभाव महाराष्ट्र दिसून आला . डाॅ नरेंद्र दाभोळकरांना झालेल्या गोळ्या हे दाखवत आहे. मानसिकता बदलण्याचा प्रयत्न किती होत आहे ज्या महापुरुषांनी आपली सगळी हयात देश हिता साठी घालवली आज त्यांना या जातीचे त्या जातीचे म्हणून ओळखतात. काही चार माथेफिरु बोलतात आणि बाकी ऐकतात हे बंद झालं तरच हे संकुचित पण नाहीस होण्यास सुरुवात होईल.

• सहावा " स " हा स फार वेदना देतो कारण कोणालाच आज संतुष्ट होण्यास स्वारस्य नाही आहे. प्रत्येकाला हीच हाव आहे की अजून कस मिळवता येईल. न थांबता कोणाचा विचार न करता पैसे ऐशोआराम, चैनबाजी कशी करता येईल. प्रत्येकाला श्रीमंत बनायच आहे गडगंज पैश्याचा साठा हवा आहे. अ संतुष्टीचा आत्मा ( भूक ) माणसे मारण्याची तयारी करुन घेईल.

• सातवा " स " हा " स " म्हणजे शेवट असं काही नाही आहे याहून आधिक प्रकारचे " स " आवती हवीत नजर फिरवली तर दिसतात. हा " स " म्हणजे सोयस्करपणे आपली वाट बदलणे स्तंब्धता आज काल नविन फ्याड आहे. एखाद्या वक्तीचा आपघात झाला तर पहिला हात मदतीचा नसतो तर तो खिशात असलेल्या मोबाईलकडे जातो व तो अपघाती व्यक्ती कसा मरत आहे, रक्ताचा थारोळा किती आहे याचे फोटो वीडीओ काढण्यास थांबतो. ही असली स्तंब्धता काही उपयोगी नाही प्रसंग काय असतो व आपण थांबून काय करतो काही तर फक्त बघण्याची भूमिका करतात . त्यातच ते धन्यता मानतात हा " स " आपल्यात नाही ना हे पडताळून पाहा.
आशा करतो की हा भाग २ तुम्हांला आवडला असेल. प्रतिक्रिया नक्की कळवा व आपल्यात बदल आणू यात.
पहिल्या भागाची लिंक आहे यावर क्लिक करा
वाचा - " स " चे सप्तरंग http://www.bluepad.in/article?id=5ee080638e706c0007980438&referer=whatsapp● लेखक :- शुभम ज्योती चव्हाण ●


8 

Share


मर्मस्पर्शी जीवन
Written by
मर्मस्पर्शी जीवन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad