Bluepadत्या रात्री एक गम्मतच झाली...
Bluepad

त्या रात्री एक गम्मतच झाली...

Mukul Dhekale
Mukul Dhekale
15th Jun, 2020

Share


त्या रात्री एक गम्मतच झाली...रात्र दाट झाली होती ....

काळोख होता... पण वाटत नव्हता...
ज्याचं आयुष्य अंधारात असतं त्याने रात्रीच्या काळोखाचा अंदाज बांधू नये...

असो

मग मी गच्चीत गेलो..चांदण्यांना न्याहाळायला...
तेव्हाच चंद्राची अन माझी नजरा-नजर व्हायला...

तोही आला गच्चीत बसला...गालातल्या गालात जरासं हसला...
हसताना अलगत डोळ्यातला थेंब गालावर त्याच्या ओघळला...

मी विचारलं ,
काय रे राजनीनाथा रडतोस का ?

चन्द्र म्हणाला ,
जीव लावलेलं सगळं तू एकदम सोडतोस का?

मी म्हणालो ,
" अरे त्याची काळजी तू नको करुस,
माझ्या आयुष्यातल्या घडामोडी पाहून तू नको गहिवरूस...

तू जा,
तू तुझ्या चांदण्यांत जाऊन रममाण हो...
नाहीतर तुझ्या चांदण्या माझ्यावर रोष धरतील हो...

माझं आयुष्य आता मला असंच जगायचंय ,
भर दिवसा , काळ्या रातीला
आता फक्त आठवणीत रमायचंय..."

चंद्र म्हणाला ,
" कवितेत माझं वर्णन बऱ्याचदा तिला अनुसरून करतोस ,
सावरायला ती आली नाही , मीच आलो , तू मला का लांब सारतोस?

मी म्हणालो ,
" काय सांगू तुला आता ,
उमजेना काही मलाही आता...

आठवणींत तरी नुसतं कसं रमायचं रे?
भावनांना निर्विकार पणे नुसतं कसं पाहायचं रे ?

बहुत दूर आ चूका हूँ ,
वापसी अब में भूल चूका हूँ ,
मुसाफ़िर इस सफ़र का में बन गया हूँ,
देखते देखते चल दिया हूँ ...

अब येह सफर कहाँ ले जाए पता नाही ,
जहां ले जाए मंझिल भी होगी वही कही...

तुम सूनना मेरी बात ,
ढल जाये जब येह रात ,
तुम भी भुलकर मेरी बात ,
भूला देना मुझे
इस रात के साथ....

कही अगला जनम मिल जाये
तो तेरेही पास आ जाऊ ,
कही और जाने की तमन्ना
अब ना रब से रख पाऊ,

चल चलता हूँ
कही इरादा ना बदल जाए ,
अब चैन से सोता हूँ
कही रात ही ना ढल जाए...

- @मुकुल विकास ढेकळे ✨

13 

Share


Mukul Dhekale
Written by
Mukul Dhekale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad