🌷🌷जीवलग गृप अंतर्गत आजचा विषय -एक उनाड दिवस स्वतःसाठी 🌷🌷
🌷🌷विषय सुचक-आपलीच किर्तीताई 🌷🌷
प्रथम मी किर्तीताईचे आभार मानेन खूप खूप आभार किर्तीताई इतका सुंदर विषय दिल्याबद्दल.खरं सांगू मी या वेळेस ठरवलं होतं की माझा नंबर येईल तेव्हा मी "हवायं मला एक दिवस स्वतःसाठी" हा विषय देणार होते पण आता माझ्या मनातला विषय तुम्ही दिला तर मला इतका आनंद झाला म्हणून सांगू... अगदी माझ्या मनातलं बोललीस जणू...
खरंच एक उनाड दिवस हवा स्वतःसाठी, स्वतःला ओळखण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी.
मी मागचा एप्रिल महिन्यात ठरवलं होतं मस्त दोन दिवस कुठेतरी फिरायला जाईन पण... पण...एकटी कोणत्याही मैत्रीणींसोबतच जाईन घरचांना सोडून मस्त एन्जॉय करेन.मग काय भिशीचा बैठकीत आगाऊपणा करून मांडला विषय मैत्रीणींसमोर... सगळ्यांचे चेहरे आश्चर्यमिश्रीत आनंदाने माझ्याकडे बघायला लागल्या.अग पुष्पा तू म्हणतेस हे आणि तुझे मिस्टर जाऊ देतील का ते आधी परवानगी देतील का? अशा प्रश्नांचा भडीमार माझ्यावर झाला.
कारणही तसेच होते एक तर माझे सासरे म्हातारे त्यामुळे माझ्या सासूबाई गेल्यावर त्यांची जबाबदारी मी गेली बावीस वर्षे इमानेइतबारे पेलत आहे . आणि त्यातल्या त्यात माझे यजमान कोणासोबत कशाला जायचं उगीच आपण जाऊ सोबत अशी अती काळजी करणारे 😀 त्यामुळे एकटं हूंदडता आलंच नाही.मी त्यामुळे खूप बोअर झालेली...
त्यातल्या त्यात दोन वर्ष कोरोनाचा धाकात घरातच रहा... स्वस्थ रहा...चे डोस पाजले सगळ्यांनी. 😀
मी पक्कं ठरवलं यावेळी दोन दिवस हूंदडायला जायचचं. तेव्हा मी ही कविता लिहून देवाला साकडं घातलं. 🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
हवा आहे मला एक दिवस स्वतःसाठी
नकोय कसले ओझे माझ्या पाठी
करेन आराम,जाईल मस्त सिनेमाला
जगून तर बघू एक दिवस स्वतःसाठी
एकदिवस कामांना मारेल मी दांडी
मस्त हूंदडून खाईल चटपटीत पाणीपुरी
मैत्रीणींशी गप्पा अन् मनमुराद हसणं
आठवणीत रमून इच्छा होईल पुरी
असा हा मस्त दिवस जगायचांय मला
देवा होईल का रे पूर्ण माझी इच्छा
तूच कर काहीतरी अन् सोडव पिच्छा
तूच माझा मायबाप दे एक दिवस मज आनंदाचा!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मग काय मी मैत्रीणींना म्हटले "बघा बुवा मी तर काढणारंच परवानगी तुमचं तुम्ही ठरवा."
अशा प्रकारे मी सगळ्या सख्यांना घेऊन मस्त ओंकारेश्वर उज्जैन आणि इंदोर फिरली घरुन काहीच न्यायचे नाही जी मज्जा करायची खायची, फिरायची ती सगळी बाहेरच अहोंची परवानगी घेतांना मी म्हटले सर्व जणी जातायेत त्यांनी गळ घातलीय तुला यावंच लागेल.मग काय...का...कू करत अहोंनी दिली एकदाची परवानगी😀 मुलगा तर म्हणाला जाऊनच ये आई घरी काॅलही करु नको मस्त एन्जॉय कर 😀 टिफीन वाल्या ताईंना विनंती केली.
अशाप्रकारे आमची दोन दिवसांची सहल निघाली सगळ्याच जणी एकदम खुश 😀काय बोलू आणि काय करु... जणू काही कैदेतून सुटका झाली सगळ्या जणींची.पहाटे तीनला बरोंबर क्रुझर गाडीने निघालो सकाळी आठ वाजता वाटेत एक गणेशमंदिर लागलं तिथे थांबलो फ्रेश झालो कुणी चहा बिस्कीट तर कुणी काॅफी आणि मग मनाजोगा नाश्ता कुणी खमणढोकळा तर कुणी मस्त गरमागरम भजी खाल्ली मी तर बाई भजीच खाल्ली 😀
नऊ पन्नासला ओंकारेश्वरला पोहोचलो.तिथे भल्या मोठ्या रांगेतून रस्ता काढत...बम बम भोले... चा नाद करत भोलेनाथाचं मनापासून दर्शन घेतले. तिथुन आम्ही नावेत बसून तिकडचा तिरावरील ममलेश्वराचे दर्शन घेतले, नर्मदा नदीत स्नान करून नर्मदेला ओटी वाहिली.पोटात आता भुकेचा आगडोंब उसळला होता सगळ्या जणींनी हाॅटेलचा रस्ता पकडला मी मस्त चायनीज पदार्थ मागविले.मनसोक्त खाऊन पिऊन गाडीत बसलो.तर समोर आईस्क्रीमवाला दिसला.मग खावोजी ऐश करो....चा आविर्भावात तेही खाल्लं 😀
अशा मस्त एन्जॉय मूड घेऊन मी दोन दिवस फिरले. जे पटलं ते केलं, खाल्लं रात्री पिक्चरला 9 ते 12 ला गेलो. असा हा मस्त उनाड दिवस मी कधीच विसरू शकत नाही.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खरंच स्त्रीचं जीवन म्हणजे कसोटी असते.
शर्टचा तुटलेल्या बटणांपासून ते पुरुषाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला जोडण्याची जी हिंमत फक्त आणि फक्त एक स्त्रीचं करु शकते... पण पुरुष मात्र ते समजून न घेता तिच्यावर अशी वेळ आली तर लेक्चर देऊन ते स्वतः कसे बरोबर आहे हे सिध्द करायचा प्रयत्न करतात.म्हणून मी म्हणते एक दिवस स्वतःसाठी काढा स्वतःचा आंत डोकावून बघा. स्वतःचं अस्तित्व जपा.जे दुस-यांना येतं ते तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल.फक्त स्वतः आत्मविश्वासाने चालत राहा. यश नक्कीच तुमचा पदरात असेल.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
म्हसावद जि नंदुरबार