*सैनिक*
थोर यातना सोसून ज्यांनी
देह भारतभूला अर्पिला
वंदन करूया पवित्र स्मृतीस
अन थोर त्या बलिदानाला
प्रेमाची ती नाती सोडली
सोडले घरदाराला
सोडला संसार सुखाचा
त्यागले लडिवाळ्यांना
कर्तव्या जे तत्पर असती
मोह सुखाचा ना मनी
भारतभूला रक्षिण्याची
सदैव असते आस तनी