Bluepad | Bluepad
Bluepad
अल-जवाहिरी संपला तरी, अलकायदा संपलेला नाही!
Mangesh Acharya
Mangesh Acharya
6th Aug, 2022

Share

अल-जवाहिरी संपला तरी, अलकायदा संपलेला नाही!
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य, देवग्राम
8550971310
अल-जवाहिरी संपला तरी, अलकायदा संपलेला नाही!
अल-जवाहिरी याच्या मृत्यूचे वृत्त संपूर्ण जगाने ऐकले आणि लादेनच्या अंताची सर्वांना आठवण झाली. अमेरिकेने अल-जवाहिरी संपवणे अपेक्षितच होते. या प्रसंगाने अल-कायदा या दहशतवादी संघटनेची पुन्हा नव्याने चर्चा व्हायला लागली आहे. ‘पाया’ अल-कायदाचा अरबीमध्ये अर्थ होतो. ही एक प्रतिबंधित दहशतवादी संघटना जगभरात शांततेच्या, मानवतेच्या आणि पाश्चत्य विचारधारेचा विरोध करते. पाश्च्त्यांच्या मित्रांशी आणी आशिया आणि आफ्रिकेतील सरकारांवर प्रभाव टाकणे हा अल-कायदाचा महत्वाचा अजेंडा आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेची स्थापना 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात अफगाण-पाकिस्तान सीमेवर झाली. या काळात अफगाणिस्तानवर सोव्हिएत युनियनचा ताबा होता. अनेक संघटना सोव्हिएत युनियनच्या विरोधात काम करत होत्या. अरबी मुजाहिदीनही त्यातलाच एक होता. अरबी मुजाहिदीनच्या काही हयात असलेल्या सैनिकांनीच या संघटनेचा पाया घातल
अल-कायदा हे नाव त्याकाळी सर्वांच्या परिचयाचे होते. अल-कायदा पाश्चात्य देशाबरोबरच मानवतेच्या अस्तित्वालाही मोठा धोका मानला जात होता. अल-कायदाने एकापाठोपाठ एक असे अनेक हल्ले त्याच्या स्थापनेपासूनच सुरु केले होते. अनेक तरुणांना आकर्षित करून संघटनेत सामील होण्यासाठी विविध प्रलोभने या संघटनेकडून दिली जात होती
अल-कायदाने 1998 मध्ये एकाच वेळी केनिया आणि टांझानियामधील यूएस दूतावासांवर बॉम्बस्फोट केले, ज्यात बहुतेक आफ्रिकन नागरिकांचा मृत्यू झाला. येमेनच्या एडन बंदरात 2000 मध्ये अल-कायदाने प्रचंड स्फोटकांनी भरलेले अमेरिकन जहाज यूएसएस कोल उडवले. या हल्ल्यात 17 खलाशी ठार झाले आणि अब्ज डॉलर्सची युद्धनौका उद्ध्वस्त झाली होती. अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाला 9/11 हल्ल्याने मोठा धक्का अल-कायदाने दिला. 9/11 च्या हल्ल्यात सुमारे 3,000 लोक मारले गेले. या घटनेनंतर अमेरिकेच्या दृष्टीनेसुद्धा दहशतवाद संपविणे महत्वाचे झाले.
अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी 9/11 घडवून आणण्यासाठी अनेक महिन्यांच्या गुप्त नियोजन करून चार अमेरिकन व्यावसायिक विमानांचे अपहरण केले. त्यापैकी दोन बोस्टन, एक वॉशिंग्टन डीसी आणि एक नेवार्कहून कॅलिफोर्नियाला पोहचवले. यातील दोन विमानांमधून दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. दहशतवादी इथेच थांबले नाहीत, त्यांनी पुढचे लक्ष्य अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉन बनवले. तिसरे विमान थेट इमारतीला धडकले. तर चौथ्या विमानातील प्रवाशांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले. प्रवासी आणि दहशतवाद्यांमध्ये हिंसक चकमक उडाली आणि विमान कोसळले. विमानात बसलेले सर्व प्रवासी आणि दहशतवाद्यांना आपला जीव गमवावा लागला.
अमेरिकेवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्याने अमेरिकेच्या दोन दशकांच्या ‘वार ऑन टेरर’ मिशनचा पाया घातला. 9/11 चा संपूर्ण कट आणि प्लॅनिंग अल-कायदाने अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागात असलेल्या तळांवरून रचले होते. येथे त्याला तालिबानने आश्रय दिला होता. त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनने मिळून अफगाणिस्तानवर आक्रमण केले. दोन्ही देशांच्या सैनिकांनी तालिबानला हटवले आणि अल-कायदाला हुसकावून लावले. त्यानंतर अल-कायदाचा तत्कालीन म्होरक्या ओसामा बिन लादेनला शोधून मारण्यासाठी अमेरिकेला आणखी 10 वर्षे लागली.
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा जुना गुरू डॉ. अयमान अल-जवाहिरी आला. सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात नुकताच अल-जवाहिरी मारला गेला आहे. अल-जवाहिरी, एक माजी इजिप्शियन सर्जन, एक पुस्तकी किडा होता आणि तो त्याच्या डोळ्यांवर मोठ्या फ्रेमचा चष्मा घालत असे. तरुण जिहादींमध्ये बिन लादेनबद्दल एक वेगळंच वेड होतं. हा वेडेपणा जवाहिरीबाबत कधीच दिसला नाही. जवाहिरीच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत त्याचा नेतृत्वाखाली हिंसक मानसिकतेच्या तरुण जिहादींमध्ये आपले स्थान निर्माण करू शकला नाही.
अल-जवाहिरी नेहमीच व्हिडिओ संदेशाद्वारे पाश्चिमात्य आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करण्याचे आवाहन करीत होता. काही काळापूर्वीच, स्वतःला इस्लामिक स्टेट किंवा इसीस म्हणवणाऱ्या एका नवीन अति-हिंसक गटाने अल-कायदाला एकटे पाडण्यास सुरुवात केली होती. नव्या हल्ल्यांसाठी उत्सुक असलेल्या तरुण जिहादींनी अल-कायदाच्या नेतृत्वाची हेटाळणी करत म्हटले की, अल-कायदा फक्त चर्चा करते, इसीस कारवाई करत आहे.
9/11 चा हल्ला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश होते. अमेरिकेने संकेतांकडे दुर्लक्ष करूनही, हल्ले अंशतः यशस्वी झाले कारण सीआयए आणि एफबीआय यांच्यात समन्वयाचा अभाव होता. मात्र आता त्यात बदल झाला आहे. यूएस आणि पाश्चात्य गुप्तचर संस्था आता पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी झालेल्या आहेत. ते आता दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात नियंत्रित करतात. परंतु गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबानचे सत्तेवर आलेले पुनरागमन आणि पाश्चिमात्य देशांच्या अराजक वृत्तीने पुन्हा एकदा अल-कायदालाने चुलबुल करायला सुरुवात केलेली आहे.
अल-कायदा पुन्हा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. अल-जवाहिरी तालिबान नेतृत्वाच्या जवळ असलेल्या काबूलमध्ये सुरक्षित घरात राहत होता. हे स्वतःच चिंताजनक आहे. तालिबानमधील कट्टर जिहादींना अल-कायदाशी आपले संबंध कायम ठेवायचे आहेत हे यावरून दिसून येते.
अल-कायदासाठी अफगाणिस्तानला विशेष महत्त्व आहे. याच ठिकाणी ओसामा बिन लादेन गुहेत राहत होता. ओसामा बिन लादेनने 1980 च्या दशकात अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या सोव्हिएत युनियनच्या विरोधात आपल्या अभियांत्रिकी पराक्रमाचे प्रदर्शन केले होते. सोव्हिएत युनियनला आव्हान देण्यासाठी बिन लादेनने गुहा संकुल बांधले. तो तालिबानच्या संरक्षणाखाली 1996-2001 दरम्यान पाच वर्षे येथे राहिला आणि इथेच अल-कायदा आता पुन्हा आपला ठसा वाढवू पाहत आहे.
एकेकाळी अल-कायदा ही भौगोलिकदृष्ट्या छोटी, केंद्रित आणि मर्यादित संघटना होती, आज ती एक जागतिक संघटना बनली आहे. तिचे अनुयायी जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. सोमालियामध्ये ‘अल-शबाब’ हा अल-कायदाशी संलग्न असलेला सर्वात प्रमुख जिहादी गट आहे. अल-कायदा आणि इसीस सारख्या जिहादी गटांसाठी आफ्रिका एक नवीन रणांगण म्हणून उदयास आले आहे. विशेषतः उत्तर पश्चिम आफ्रिकेतील साहेलच्या आसपासचा प्रदेश हा या संघटनेचा नवीन टार्गेट आहे.
अल-कायदा ही मध्यपूर्वेतील एक दहशतवादी संघटना आहे. बिन लादेन हा सौदी अरेबियाचा होता, अल-जवाहिरी इजिप्तचा होता, संघटनेचे जवळपास सर्व वरिष्ठ नेते अरबी आहेत. अल-कायदाचे उत्तर-पश्चिम सीरियामध्ये लक्षणीय अस्तित्व आहे. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर, अल-कायदा आता नवीन नेता आणि नवीन रणनीतीसह पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेऊ शकते. या गटाची धमकी अल-जवाहिरीच्या मृत्यूने संपली असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत ठरणार नाही.

236 

Share


Mangesh Acharya
Written by
Mangesh Acharya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad