Bluepad | Bluepad
Bluepad
भटकंती शांत रमणीय ठिकाणांची.
Kiran Sarjine
Kiran Sarjine
6th Aug, 2022

Share

मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जगात म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या शहरात जगगण म्हणजे दगदग. अगदी विट येतो या जगण्याचा. बर कुठे निवांत जागी जायच म्हटल तर सगळीकडे गर्दी. मग आता कुठ जायच?
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे. तर चला मग भटकंती करायला. हि सर्व स्थळ उत्तर भारतात आहेत बर का स्वेटर घेऊन चला म्हणजे थंडी वाजनार नाही.
१) धरमकोट - ज्यांना एकांत प्रिय आहे त्यांच्यासाठी हे अगदी
योग्य ठिकाण. ईकडे मॕकलुगंज येथुन रिक्षानेही जाता येते.
२) खिरसू - गढवाल मधील हे गाव हिमचलच्या केंद्रस्थानी आहे.
हिमच्छादित शिखर आणि हिरव जंगल बघितली की मन तृप्त
होऊन मानसिक तणाव दुर होतो.
३) शोगी - रमणीय असे सुंदर हे गाव हिमाचल प्रदेशात आहे.
हिमाचल प्रदेशातील खाद्य संस्कृती आणि नयनरम्य निसर्ग
बघायच असेल तर या ठिकाणी भेट द्याच.
४) चोप्टा - भारतातल छोट स्वित्झर्लंड बघायच असेल तर या
ठिकाणी भेट द्याच. गिर्यारोहकांसाठी तर हे ठिकाण म्हणजे
स्वर्गच.
५) पागोट - पक्षीप्रेमीची पंढरी अशी बिरुदावली मिरवणारे हे गाव
नैनीतालपासुन १४ किमी अंतरावर वसलेले आहे. या गावच्या
व आजुबाजूच्या परिसरात किमान १५० प्रजातीचे पक्षी
सापडतात.
६) स्पिती - हे ठिकाण पर्यटकांच्या ओळखीचे असले तरी ईथले
निसर्ग सौंदर्य वाखाणण्यासारखे आहे.
शब्दांकन
किरण सरजिने
भटकंती शांत रमणीय ठिकाणांची.

188 

Share


Kiran Sarjine
Written by
Kiran Sarjine

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad