सिद्धेश टेरेस वर उभा राहून सिगारेट मागे सिगारेट ओढत धुराचे लोट हवेत सोडत होता. कुठल्या तरी गहण विचारात होता. कित्येक तास उलटून गेले होते आणि कितीतरी सिगारेट ओढून झाल्या होत्या त्याच्या. बाकी जगाशी जणू काही त्याचा काहीच संबंध नव्हता.
या दरम्यान सायली कितीतरी वेळा टेरेस वर आली आणि सिद्धेश ला या अवस्थेत पाहून निघून गेली होती. पण सिद्धेश ला तर त्याचं सुद्धा भान नव्हतं.
सिद्धेश च्या हातात असलेल्या सिगारेट चा शेवटचा कश त्याने घेतला... आकाशाकडे पहात धुराचा मोठा लोट त्याच्या तोंडातून त्याने बाहेर फेकला.
"सिद्धेश?" सायली ने सिद्धेश ला आवाज दिला..
"हम्म्म" सिद्धेश ने थंड प्रतिसाद दिला.
"मी कधीपासून तुझी खोलीत वाट पहात आहे."
"सॉरी"
"ठिक आहे सिद्धार्थ, sorry नको म्हणु... पण आता जावूया का खाली? तुझ्या लक्षात आहे ना आज आपली first night आहे ?"
"First Night?" आणि सिद्धार्थ जोरजोरात हसू लागला. काही क्षणांत तो शांत होवुन गंभीर झाला. सायली कडे वळला... तिचा हात त्याने आपल्या हातात घेतला, तिच्या नजरेला नजर देत बोलायला लागला..
"सायली, तुला माहिती आहे? तू माझी best friend होतीस. लहानपणापासून मी माझ्या सर्व गोष्टी फक्त तुझ्यासोबत share करत आलोय. माझं सुख असेल, माझा आनंद असेल, माझं दुःख असेल, माझं tension असेल, माझ्या मैत्रिणी असतील... सर्व काही तुला सांगत आलोय. पण आज..."
"पण काय सिद्धेश? "
सिद्धेश तिच्यापासून थोडा बाजूला झाला. त्याने आणखी एक सिगारेट पेटवली, एक मोठा कश घेतला, धुराचा लोट पुन्हा एकदा हवेत सोडला... सायली फक्त त्याला पहात होती, तिला तिच्या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता लागून होती.
"बोल ना सिद्धेश... पण काय?"
" पण मी तुला कधी बायकोच्या रुपात पाहिलंच नाही गं. मला तुझ्यात नेहमी फक्त माझी best friend दिसत होती. पण आपल्या घरच्यांनी जबरदस्तीने आपलं लग्न लावून दिलं आणि... आणि.. आज मी माझ्या best friend ला गमावून बसलो."
असं म्हणत त्याने पुन्हा एक कश घेतला... तिकडे सिद्धेश जळत्या सिगारेट ला तोंड लावून धूर सोडत होता आणि इकडे सायली च्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं.