Bluepad | Bluepad
Bluepad
🔆'सीता'-रहस्य 🔆
उपेंद्र सावंत
उपेंद्र सावंत
6th Aug, 2022

Share

सीता ह्या रामायणातील व्यक्तिरेखेचा योग्य अभ्यास केल्यानंतर रामायणातील काही गुढ रहस्ये आपोआप उलघडू लागतात. राम हे शिवरूप असून, सीता हे शक्ति रूप आहे. सृष्टीची निर्मिती ही शक्तीकडून होत असते. सर्व घडामोडींचा भाग हा शक्तीं तत्वाकडे येतो. माया रूप सीते मुळे रामायण घडले, असं म्हटलं जातं. कारण, सीता हीच सृष्टीरूप व शक्तीरूप आहे. हाच भाग, महाभारतातील द्रौपदी हा व्यक्तिरेखेबाबत म्हटला जातो.
अग्नी 🔥बीज रुपी 'राम 'ह्या मंत्रापुढे 'श्री ' हे बीज ( श्रीराम )लावले जाते. अग्नीबीजाची दाहकता कमी व्हावी याकरिता 'ईकारयुक्त ' "श्री" ची योजना केली जाते. (" पादुका -दर्शन रहस्य " या लेखातही मी ह्याचा उल्लेख केला आहे). सीतारूप "स्त्री "तत्वाला प्रथम प्राधान्य दिलं जातं. आपण कुठेही पाहिलं तरी... "सीताराम "... इथे' सीता' तत्त्वाचा उल्लेख 'राम'तत्त्वाच्या आधी केला गेलेला आहे. त्याचप्रमाणे " राधाकृष्ण " असं संबोधलं जातं. इथे सुद्धा "राधा " तत्त्वाचा उल्लेख "कृष्णा"च्या आधी केला जातो. "रामसीता" किंवा "कृष्ण -राधा "असं म्हटलं जात नाही, असो!
'राम' हे सीतेचे लक्ष्य 🎯आहे. सीता ही आपल्या शरीरातील 🪱कुंडलिनी शक्ती होय. ह्या सीतारुपी -शक्तीला आत्मारामाची ओढ असते. सीता ही आपल्या प्रत्येकाच्या शरीरात अस्तित्वात असते. आत्माराम देखील आपल्या अंतरंगात आहे. हे ध्यानात असू द्या. रामायणाचा प्रतीकात्मक अध्यात्मिक अर्थ लक्षात घेऊन... साधकाच्या शरीरातील अंतर्गत तंत्राचाअभ्यास आपण करत आहोत.
🔆सीता 🔆:-1) सीता ही मानवी शरीरातील मुलाधार स्थित " कुंडलिनी शक्ती "(serpent power)होय.समस्त सृष्टीचं आपल्या शरीरात असणार हे अंशात्मक रूप आहे. ही कुंडलिनी शक्ती मानवी शरीरात गुप्त रूपात वास करते. सृष्टीच्या खेळात सामील झालेली ही कुंडलिनी शक्ती....." मनारुपी आच्छादनात "( आवरणात )आपल्यासमोर प्रकट होत असते.
2) मुलाधार चक्राचा संबंध भू - तत्वाशी येतो. भू: म्हणजे आपला पृथ्वी लोक होय. मुलाधार चक्र हे मेरुदंडाच्या खालच्या टोकाला सूक्ष्म शरीरात अस्तित्वात असते. मुलाधार हे शरीरातील भू : लोकांचं प्रतिनिधित्व करतं. ह्याचा संबंध जमिनीशी येतो. रामायणातील जनक राजाला जमीन नांगरताना सीता प्राप्त होणे.... व अखेरीस पुन्हा धरणी मातेमध्ये तिचे विलीनीकरण होणे.... हा भाग सांकेतिक पद्धतीने दर्शविला आहे. थोडक्यात,सीता ही आपल्या शरीरातील वास्तव्य करणारी कुंडलिनी जगदंबा होय. याकरिता ती भूमीमध्ये सापडली असं, प्रतिकात्मक दृष्ट्या रामायणात दाखवला गेलं आहे.
3) सीता हे साधकाचे 'मन' होय. माया ( सीता )रूपाने अवतीर्ण होत असल्याने.... मन रूपाने ती प्रकट होते. सीता हे साधकाच्या मनाचे प्रतीक आहे.
4) सीतारुपी- मनाला ( mind) दशेंद्रीय रुपी रावण ( पंच ज्ञानेंद्रिय + पंच कर्मेंद्रिय) हा भौतिक जगातील सुख लालसांकरवी / प्रलोभनांतर्फे ( sensuous materialistic pleasures) भुलवत राहतो. दशेंद्रीय ही मनाला उद्दीपित करतात. रावण रुपी- दशेंद्रीय ही......मनरूपी -सीतेला.... लक्ष्मण- रुपी जाणीवेने.... आखून दिलेली मर्यादा ओलांडायला लावतात. ह्या मर्यादेला " लक्ष्मण रेखा " म्हणतात.
5) रावणाला नकार देऊन सीता अशोक वनात बसून राहते. इथे सितारुपी - मनाला चूक समजल्याने... ते रामावर एकाग्र होते. इथे मनोनिग्रहाचा भाग येतो. मन रामाच्या स्मरणात राहिल्याने साधकाला दुःख जाणवत नाही. ही अवस्था म्हणजे अशोकावस्था होय. अशोका म्हणजे =अ + शोका = दुःख विरहित अवस्था!
6) सीतारूप - मन.... याचं अस्तित्व म्हणजे संकल्प विकल्पाचा भाग आला. मन आहे तिथे संकल्प आलेच समजा! चंद्ररुपी मन हे चंद्रकलांप्रमाणे आंदोलीत होणार, हे निश्चित असतं! राम ही साधकाची 'अ + मन ' अवस्था होय! साधक ही अवस्था प्राप्त करण्यासाठी "रामाची "आराधना करतो.
7) राम हा सीतेशी विवाह करतो, त्या क्षणी अनेक संघर्ष / आव्हाने त्याच्या समोर उभी ठाकतात. शिवाचा अंश - राम.... हा शक्ति रूप सीतेशी विवाहित होतो... हा भाग एक प्रकारे प्रतीकात्मक आहे. "एकोsहम बहूस्याम " प्रमाणे शिव हा शक्तीसह =सृष्टी निर्माण करतो. या ठिकाणी एकत्वातून = अनेकत्व आले.... म्हणजेच विषमता निर्माण झाली. विषमता ही संघर्षाला जन्म देते. सृष्टी निर्मिती म्हणजे एकमेकांवर कुरघोडी आलीच! ह्या जगामध्ये आपल्याला विविध रूपांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. थोडक्यात, शिव रूप राम हा निश्चल अवस्थेमध्ये असतो, मात्र शक्ती स्वरूप सीतेचा त्याच्या जीवनामध्ये आगमन होताच.... संघर्ष निर्माण होतो.
8) सीतारुपी- मन... मारीच रुपी राक्षसी मायेला फसते. सोन्याचे हरण ही मायाच होय. लक्ष्मण रुपी जाणिवेला याची पूर्ण कल्पना असते. तरीही मनरूपी सीता त्याला राम शोधार्थ पाठवते. त्यानंतर दशेंद्रीय रावणातर्फे तिचं अपहरण होतं. मायारूपी दुनियेत साधकाने सतत जागृत अवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे... याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे.
9)' राम ' ही साधकाची 'उच्च अवस्था 'आहे. मन हे रामाशी एकरूप झाल्यास सीता ( मन ) अस्तित्वहीन होते. बहिर्मुख मन = ही सीता अवस्था होय. साधकाचे अंतर्मुख अवस्था ही त्याला 'रामावस्थे 'कडे घेऊन जात असते.
10) राम हा शिवरूप आहे.... सीता ही शक्ती(माया )रूप आहे.
🔆'सीता'-रहस्य 🔆
( या पुढील भागात... आपण रामायणातील अशाच काही व्यक्तीरेखा... व त्यांचे प्रतीकात्मक अर्थ विस्तारित दृष्ट्या पाहू!.... 🔆" रामायण रहस्य "... ह्या लेखात!!)

120 

Share


उपेंद्र सावंत
Written by
उपेंद्र सावंत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad