आयुष्य जसं जसं पुढे जात असतं, तशी-तशी आपल्या मैत्रीच्या यादीत नावे जमा होत असतात..
अगदी ती व्यक्ती असो वा प्राणी, पक्षी..
पण आपल्या बालमैत्रीच नाव कायम अग्रस्थानी असतं...
आठवणींच्या हिंदोळ्यावर कायम तरंगत असणारी नौका
असते ती...!
अशीच माझी बालपणीची मैत्रीण शुभांगी (बाली) सर्व तिला बाली म्हणून ओळखत.शुभांगी नाव फक्त नावालाच आहे..
बाली हि माझी खास मैत्रीण, अगदी माझी सावलीच जणू...
कधी मी एकटी दिसले की मला हमखास विचारला जाणारा प्रश्न असे ,आज एकटीच,बाली नाही,काही भांडण झाले आहे की काय तुमचं? आणि तिलाही हा प्रश्न असायचा...
इतकी सुंदर आमची मैत्री...
एखाद्या रविवारी माझी आज्जी, आम्हाला मेथीची भाजी विकायला पाठवत.
मी आज्जीला सांगितले की मी भाजी विकायला जाते .पण तू बालीला सांग भाजी घ्या.. भाजी...असे ओरडायला.मी नाही ओरडणार.मग आज्जी बालीला सांगे, आणि ती लगेच तयार असे. आम्ही भाजी विकून आल्यावर आज्जीला हिशोब देत असे.आणि मग ती आम्हाला खाऊ देत असे...
अशी छान आणि गोड मैत्री होती,आम्हा दोघींची आणि आहे अजूनही... अजून शबिना, योगिता, नुतन, सिमा, शुभांगी आणि कांचन, वैशाली , सुनिता, ललिता या सर्व माझ्या बालपणीच्या गोड मैत्रीणी...
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!