Bluepad | Bluepad
Bluepad
इच्छा ( desires )
ज्योती (वल्लभा)गोरे
ज्योती (वल्लभा)गोरे
6th Aug, 2022

Share

हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकलें,
कितने निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले 🌹
इच्छा... इच्छा सगळ्यांनाच असतात. 1 Rk मध्ये राहणाऱ्याला वन बीएचके मध्ये जायचं असतं. भाड्याने राहणाऱ्याला छोटसं का होईना स्वतःचं घर घ्यायचं असतं. वन बीएचके मध्ये राहणाऱ्याला टू बीएचके हवा असतो. टू बीएचके मध्ये राहणाऱ्याला एखादं फार्म हाऊस, लक्झरी कार्स हव्या असतात. हेही सर्व असणाऱ्याला अंबानी व्हावंसं वाटत असतं .
इच्छांना अंत नाही. काही जणांना वाटतं " अगर मिल नही रहा तो छीन लेते है "... पण सुखी समाधानी आणि प्रॉब्लेम फ्री जगण्याची किल्ली " अंथरूण पाहून पाय पसरावेत " हीच आहे. ज्याला हे जमलं तो जिंकला!
इच्छा असूच नयेत का? महत्वाकांक्षा असूच नये का? जरूर असावी.... जसं " परिवर्तन संसार का नियम है " तसंच " प्रगती करणे हे मानवाचे ध्येय नक्की असावं "... पण योग्य मार्गाने,योग्य विचाराने.. त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे हवं हे ठीक आहे पण आपल्याला खरोखर त्या गोष्टीची गरज आहे का? किंवा ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे का? ती गोष्ट संभाळायला आपल्याला जमणार आहे का? एवढे प्रश्न स्वतःला विचारून उत्तर काय येते ते पहावे अनं मग पुढे प्रयत्न जरूर करावेत..
अमक्याला अमुक औषध जमलेआपल्याला तेच औषध लागू पडेल असे असते का? आयुष्याचंही असंच असतं! आपल्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीचं अमुक व्यक्तीशी छान जमतं म्हणून आपलंही त्या व्यक्तीशी जमतंच असं असतं का? हाताची पाची बोटं सारखी असतात का? मग असमाधान किंवा तक्रारी बाळगून मनशांती भंग करण्यात काय हशील?
सकारात्मक राहून सकारात्मक इच्छांना योग्य त्या सकारात्मक प्रयत्नांची जोड नक्की द्यावी. अपेक्षाभंग होईल म्हणून अपेक्षाच करू नये हे जसे चुकीचे तसेच अतिरेकी व चुकीच्या अपेक्षा बाळगून त्यासाठी अयोग्य मार्ग अवसरणे ही तितकेच चुकीचे.. आपली इच्छा जर दुसऱ्याचे नुकसान करवणारी वा त्याच्या जीवावर उठणारी असेल तर ती सकारात्मक इच्छा होऊ शकत नाही. म्हणून समतोल साधता यायला हवा...
"I desire to live, not just exist " ( नुसतच अस्तित्वात असण्यापेक्षा इच्छा असावी ती जगण्याची ) प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची इच्छा ही सर्वात सुंदर "इच्छा "होय..
इच्छा रुपी घोड्याचा लगाम आपल्या हातात आहे. आता हा घोडा दौडवायचा की त्याला उधळू द्यायचं हे देखील आपल्याच हातात आहे. कसाही उधळू दिला तर एक दिवस स्वाराला खाली फेकणार हे निश्चित!!
शत्रू वर विजय मिळवणाऱ्या पेक्षा स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवणारा अधिक शूर असतो.
Peace begins when desire ends!!!
जिथे इच्छा संपतात तिथूनच मनः शांततेला सुरुवात होत असते.. 🪅
लेख आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद 🙏
इच्छा ( desires )

0 

Share


ज्योती (वल्लभा)गोरे
Written by
ज्योती (वल्लभा)गोरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad