Bluepad | Bluepad
Bluepad
सत्ता (अधिकार ) प्राप्तीची ४८ सूत्रे  (भाग २)
Aarya
Aarya
6th Aug, 2022

Share

48 लॉज ऑफ पॉवर या इंग्रजी पुस्तकाचे लेखक रॉबर्ट ग्रीन आहेत . त्याचा हा मराठी भाषेतील सारांश आहे. सत्ता म्हणजे फक्त राजकीय सत्ता किंवा अधिकार असा मर्यादित अर्थ नसून आपला व्यवसाय आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
एकूण ६ भागांमध्ये ४८ सूत्रे प्रकाशित केली जातील . काही सूत्रे खूपच बेधडक आहेत , सर्वजण सहमत असतीलच असे नाही. ही सत्तेची सूत्रे हातात घेण्यासाठी नियम / सूत्र बघूया  ...!
सूत्र ९ : तुमच्या कृतीतून तुम्ही जिंका , शाब्दिक वादविवादातून नाही . वाद शक्यतो टाळाच .
दुसऱ्यांचा विश्वास संपादन करायला आणि त्यांनी आपल्या सोबत येण्यासाठी शब्दाचा नाही तर आपल्या कार्याचा वापर करायला पाहिजे. वायफळ युक्तिवाद करणे आपल्या शक्तीचा वापर करण्याची योग्य पद्धत नाही . तुम्हाला केवळ कार्यानेच इतरांना प्रभावित करता आले पाहिजे .
सूत्र १० : दुःखी आणि दुर्दैवी लोकांचा संपर्क टाळा .
भावनिक अवस्था हि संसर्गाने बदलते . इतरांच्या चिंतेत स्वतःला चिंतीत करणे खूप सोपे आहे , त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले . तुम्ही कोणाच्या सहवासात राहता  यावर खूप काही अवलंबून असते .
सूत्र ११ :  लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवायला शिका .
तुमच्याशिवाय कोणाचं पान हलणार नाही अशी परिस्थिती  बनवलीत तर तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला नक्कीच मिळेल . आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकाना सर्वकाही शिकवू नये आणि त्यांना सर्वकाही करण्याची संधीसुद्धा द्या. त्यांना नेहमी तुमची गरज असायला पाहिजे .
सूत्र १२ : प्रामाणिकपणा आणि उदार वृत्ती यांच्या योग्य वापराने शत्रूला संभ्रमित करा .
काहीही घेण्यापूर्वी देण्यास शिकले पाहिजे . त्यामुळे तुमच्या संपर्कातील लोकांमध्ये मऊपणा , लवचिकता येते. एक प्रांजळ आणि प्रामाणिक कृती डझनभर  अप्रामाणिक कृतींना झाकून ठेवते.
सूत्र १३ : मदत मागताना लोकांच्या स्वार्थाला आवाहन करा .
लोकांची मदत मागताना त्यांच्या दयेला किंवा सहानुभूतीला आवाहन करू नका. अशा पद्धतीने आवाहन करा कि त्यांनाही त्यात त्यांचा फायदा दिसेल.
सूत्र १४: मित्रासारखे वागा , हेरासारखे कार्य करा .
लोकांकडून माहिती काढायला शिका . हेरासारखे असे अचूक प्रश्न विचारा कि शत्रू स्वतःहून त्याच्या कमतरता उघडपणे सांगेल.कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हेरगिरी साठी वापरले पाहिजे . तुम्ही काय करत आहेत याचा थांगपत्ता सांगायचा नसेल तर गोल फिरवून बोला .
सूत्र १५ :  शत्रूला पूर्णपणे नष्ट करा .
अर्धवट मेलेले सापासारखे जनावर जास्त धोकादायक असते , म्हणून शरीर आणि मनाने शत्रूला असे संपवा कि ते कधीही वर करणार नाही . प्रतिहल्ला करण्याची कोणतीही संधी देऊ नका .
सूत्र १६ : आदर आणि मानसन्मान मिळविण्यासाठी अनुपस्थितीचा वापर करा .
तुम्ही नेहमीच उपलब्ध असाल तर तुमचे महत्त्व कमी होईल , तुम्ही सर्वसाधारण बनाल . समाजापासून थोडं दूर राहा . तुम्हाला जाणवेल कि लोक तुमच्याबद्दल उत्सुक असतील , बोलतील आणि तुम्ही पुढे काय करणार आहात  त्याचा विचार करतील .
क्रमश:

181 

Share


Aarya
Written by
Aarya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad