Bluepad | Bluepad
Bluepad
आम्ही जनता भिमाची
गौतम केवटे  7218381459
गौतम केवटे 7218381459
6th Aug, 2022

Share

आम्ही जनता भिमाची
हो...
नीळा झेडा गगनी .. ४
निळे निशान घेवून हाती
एक दिलाने उमटू दे
जयभिम आपल्या ओठी
तुझ्या हृदयातुन नाव येवू दे
हे नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची ... ४
भिमाची लेखनी तडपली
भारताची अस्मिता झळकली
बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने
जिवण झाले वैनव शाली
बुद्ध आणि सम्राट अशोका
या भूमीवर इथे जन्मले
आदर्शाचे अनमोल लेने
या भारताला देवून गेले
भिमाची आणि रमाईची ...
पुण्याई येथे त्याची
एक दिलाने उमटू दे
जयभीम आपल्या ओठी
तुझ्या हदयातून नाव येवू दे
हे नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची ... ४
सकपाळ घराने त्याचे
जन्मला तो भिमाईच्या पोटी
दलितांचा कैवारी झाला
त्याचे नाव आमच्या ओठी
दिला अधिकार हा त्याने
सन्मानाने आम्हा जगण्याचा
शिका सघटीत होऊनी
संघर्षाशी आज पेटण्याचा
सदैव आमच्या हृद्यामधी ...
आहे आमर तो भिमजी
एक दिलाने उमटू दे
जयभिम आपल्या ओठी
तुझ्या हदयातून नाव येवू दे
नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची ... ४
सागरापरी लहरल्या
उसळल्या हदयावरती
पाहूनी थांबला वेळ तो
माझ्या भिमाची किर्ती
लढला तो शूर मैदाणी
नव्हती तलवार त्याच्या हाती
उचलले चा भारताला
पेनाच्या टोका वरती
होता तो वाघाचा छावा ...
त्याची पोलाढाची छाती
एक दिलाने उमटू दे
जयभिम आपल्या ओठी
तुझ्या हृदयातन नाव येवू दे
हे नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची ... ४
तिरंग्यावरती अशोक चक्र
भिमाने अटल ठेविले
मिटविणार नाही हे कोन्ही
असे निशान ते रोवीले
देवूनी राज्यघटना देशाला
उपकार भारतावर केले
संत्तेचा वारसदार झाला
लोकशाहित तुला रे गणले
जिकले भिमाने या भारताला ...
संविधान वहिले भारताच्या ओटी
एक दिलाने उमटू दे
जयभिम आपल्या ओठी
तुझ्या हृदयातून नाव येवू दे
हे नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची ... ४
मनगटात हिम्मत आहे आमच्या
लाख संकटे झेलून घेवू
मनुवाद्याशी लढण्यासाठी
सदैव आम्ही तयार राहू
जरी वेळ पडली आम्हाला
जिव जिवास हि देवू
जर अंगावरती कोन्ही आले
भिम शक्तीचे पाणि दावू
सादे भोळे दिसलो तरी ...
कोन्ही येणार नाही वाटी
एक दिलाने उमटू दे
जयभिम आपल्या ओठी
तुझ्या हृदयातून नाव येवू दे
नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची .. ४
नसनसात वाहे निळाई
हि जात आमची महाराची
तुझ्या कूशीतून मिळाली
हि सावली आम्हा आईची
तू हिमालयावरूण मोठा झाला
आसरा चिल्या पिल्या पाखराचा
देवूनी आम्हा हा उबारा
ममतेच्या त्या मायेचा
तुझाच जयजयकार असावा ...
सदैव आमच्या ओठी
एक दिलाने उमटू दे
जयभिम आपल्या ओठी
तुझ्या हृदयातून नाव दे
नाव भिमाचे ओठी
आम्ही जनता भिमाची ... ४
गौतम केवटे
7218381459

178 

Share


गौतम केवटे  7218381459
Written by
गौतम केवटे 7218381459

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad