Bluepad | Bluepad
Bluepad
हिरोशिमा स्मरण दिवस
Nitesh
Nitesh
6th Aug, 2022

Share

हिरोशिमा स्मरण दिवस
६ ऑगस्ट १९४५ हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. मित्र राष्ट्रांनी जपान मधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून साऱ्या जगाला स्तब्ध केले. या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, तीन लाख वस्तीचे हे शहर नष्ट झाले. एका बॉम्बने मनाची शांती झाली नाही म्हणून ९ ऑगस्टला दुसरा बॉम्ब नागासाकी शहरावर टाकण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले.
परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्ध लगेच संपुष्टात येऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती.
६ ऑगस्ट १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी-२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले.
विज्ञानानेच मानवाच्या आत्मविश्वासावर केलेला तो मोठा हल्ला होता. मानवाच्या क्रुरतेपुढे मानवाच्या साहस व शौर्याला पराजय पत्करावा लागला. जपानने या बॉम्ब हल्ल्यानंतर सपशेल शरणागती पत्करली.
अणुबॉम्बच्या या विध्वंसक परिणामामुळे केवळ नागरिकच नाही तर शास्त्रज्ञही चिंताग्रस्त झाले. या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाइमर यांनी तर पश्चातापामुळे राजीनामा दिला.
हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अ‍ॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या २००० फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ.मैल एवढा भाग नष्ट पावला. या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व आजार यामुळे मृत्यू पावले.
२ सप्टेंबर १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करल्यावर दुसरे महायुद्ध संपले.

180 

Share


Nitesh
Written by
Nitesh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad