Bluepad | Bluepad
Bluepad
दुःख साऱ्या लोचनांचे (मराठी गझल)
Shashank Khandare
Shashank Khandare
6th Aug, 2022

Share

दुःख साऱ्या लोचनांचे मी उराशी बांधतो
बोलताना चेहरा माझा खुशाली सांगतो
फडफडकत्या काजव्याला सांगले मी कैकदा
सूर्य झाल्यासारखा बघ तू कशाला वागतो..?
बायको अन लेकराची होत आहे रे गजल
मी नव्या शेरास पोटाला धरुनी राबतो
ऐवढ्याश्या जिंदगीची तूच आहे साधना
जीवनाला बस अता बघ मी तुलाची मागतो
दुःख साऱ्या लोचनांचे (मराठी गझल)
एवढ्याश्या झोपडीची आस आहे बंगला
यांचसाठी मीच भावा कैक रात्रा जागतो
✍🏻शशांक खंदारे
पुसद
८३७८९२००९२

180 

Share


Shashank Khandare
Written by
Shashank Khandare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad