Bluepad | Bluepad
Bluepad
विसंगती...
Nishu💞
Nishu💞
6th Aug, 2022

Share

प्रत्येक धर्म आणि तत्वज्ञान-
आत्म्यात परमात्मा सांगतो,
दगडाच्या पाया पडतो-
शिव्या शेजाऱ्यास देतो.
मुले म्हणे देवाघरची फुले-
आपला तो बाळू, दुसऱ्याचे कारटे,
विसंगती...
माता-पिता म्हणे परम दैवते-
पाठवितो त्यांना व्रृद्धाश्रमाच्या वाटे.
पत्नी प्रत्येकाची साक्षात "लक्ष्मी"-
मग का बघतो रे दुसऱ्याची 'काली',
भाळी भष्म मनात मात्र भस्मासुर-
थांब रे थांब जरा तुझीच पाळी आली.
चित्रे काढतांना, घर रंगवितांना-
जुळवी उत्तम रंगसंगती,
झोपला नव्हता अक्कल वाटतांना
मग जीवनी का यावी विसंगती..

246 

Share


Nishu💞
Written by
Nishu💞

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad