आज कळत नकळत सर्वजन जीव लावत होते
हो कदाचित या पुढे मी नसेल ना म्हणून,
प्रेमाने आणि डोळ्यात अश्रु घेऊन शेवटची आंघोळ घालत होते,
जी माणसे रोज नीट बोलत सुद्धा न्हवती तीच माणसे आज सारख मलाच पाहत होती,
होत होती शेवटची आंघोळ त्यात खुप प्रेमाने व मायेने पहात असे
कदाचित हे ईश्वराचीच इच्छा असेल अस म्हणत-म्हणत काही जन घाई ही करत होते,
आंघोळ ही संपत आली आता दूसर काही सुचेना,
शेवटी आई आली आणि म्हणाली बाळा जातोय का सोडून आईला,
थोडा तरी करना विचार कशी राहिल तुझी आई असे रडत रडत बोलत होती,
बाबा ही रडत म्हणत होते
काय बाळा मला बोलला होता मी आहे ना बाबा का काळजी घेताय होईल सर्व नीट सांग आता आम्ही कुना कडे पहायच आणि कुनासाठी जगयायच.
आली माझी बहिन आणि ती देखील म्हणाली का दादा का गेला सोडून आता आम्ही राखी कुणाला बांधायची अस म्हणत ती देखील रडत असे...
शेवटी झाली शेवटची आंघोळ अस म्हणत सर्वांनी शेवटच मला प्रेमांनी पाहिल
आई आणि बाबा यांना जातांनी शेवटच इतकच म्हनेल स्वतःची काळजी घ्यावी.... आणि मला माफी असावी....
.
.
- रोहित बलखंडे
( मो. 9767209794 )