Bluepad | Bluepad
Bluepad
!! पुरूषार्थ माझा !!
धर्मराज रत्तू पवार
6th Aug, 2022

Share

बोलणार , बोलणारे बोलू देत तसे ते शब्द नव्हे
मज तनूवरी कोसळणाऱ्या जणू सौदामिनी
झेलणार मी मुख मुकशब्द राहून
मम ह्रदय करूनी अवनी
शांती , शालिनता मम सले तया ती
रूतुनी वाटे का काटा
करूनी आटापिटा वाढविती लोभविकार
तयांच्या बुध्दीस फुटला फाटा
न होणार मी प्रवाहपतित न वाहत जाणारा
पुरातला दगडगोटा
ना आगिसवे जळणारा होणार नाही मी
वाळलेला लाकुडफाटा
मी पुरूषार्थी , मी तत्त्वार्थी संघर्ष असे माझा
शांती आणि धैर्याचा
पेटवून पलिता चित्तचिंतनाचा पाडिन प्रकाश
प्रखर ज्ञानाचा
मी पुरूष , पुरूषार्थ माझा सकला कथाया
न वाटे मज लाज
न मळलो , न कुणा सळलो , पाळलो मानवता
माणूस म्हणूनी उभा आज
- - - - धर्मराज रत्तू पवार

228 

Share


Written by
धर्मराज रत्तू पवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad