Bluepad | Bluepad
Bluepad
उद्धव ठाकरे ची वाट खडतरच
Nagesh Karpe
Nagesh Karpe
6th Aug, 2022

Share

'हिंदु हृदय सम्राट' बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार कष्टातून उभी राहिलेली शिवसेना आजच्या परिस्थितीत शेवटची घटीका मोजत आहे का? हा मोठा प्रश्न आहे. तसे पहाता ऊद्धव ठाकरेला बाळासाहेबा प्रमाणे राजकारण जमले नाही. हे माझे ठाम मत आहे. भाजपा बरोबर युती आसताना ही राजकीय चानाक्ष पणा दिसुन आला नाही. भाषणेही तसी प्रभावी नाहीत. जसे राज ठाकरे प्रभावी बोलतात तसे.
नाही म्हणायला राजकीय चलाखी दाखवण्याच्या नादात आख्खी सेनाच फुटुन बसली अन...वर्षा सोडुन घर गाठावे लागले. याच खापर राऊतावर व पवारावर फोडले जाते. यात कीतपत तथ्य आहे हे जनता ओळखते. राऊताची बेताल वक्तव्ये सातत्याने तोंडघसी पडणाऱ्या मुलाखती. हिंदुत्वाला दिली जात असलेली बगल या मुळे नाराज आमदाराची संख्या वाढत गेली अन... सगळ खरकट अंगावर घेवून पडण्याची नामुस्की आंगलट आली.
बाळासाहेबाच्या कार्य कालात राऊताला सामना सीवाय इतर गोष्टीत हस्तक्षेप करु दिला जात नव्हता. बाळासाहेब जेव्हां थकत गेले तसे राऊत फोपावत गेले. आर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण फक्त रथच चालवत नव्हता तर रणनीतीही ठरवत होता व योग्य दिशाही ठरवत होता. इथे मात्र ऊद्धव ठाकरेचे सारथ्य करणारे राऊत मात्र प्रत्येक आघाड्यावर अपयशी ठरत गेले. यालाच मराठीत आर्ध बाटकी आसे संबोधले जाते. या आर्ध बाटकी पणाचा पवारानी ऊपयोग करत आपल्या पक्षाच्या पुणरबांधनी बरोबर आर्थीक बाजु भक्कम करण्याचा प्रयत्न केला. या साठी पवारानी ठाकरेनां सेंडयावर बसवले स्वतः मध्यभागी राहीले काँग्रेसला बुडात बसवले.

0 

Share


Nagesh Karpe
Written by
Nagesh Karpe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad