Bluepad | Bluepad
Bluepad
वेध गणपतीचे
प्रतिभा
6th Aug, 2022

Share

श्रावण महिना आला की सणांचे वेध लागतातच.
पण त्याबरोबर गणपती आगमनाची तयारी जोरात सुरू होते गणपतीचे कारखाने सगळीकडे दिसू लागतात आणि त्या मूर्ती वरचे त्यांचे हात भराभरा फिरू लागतात. कारागीर लोकांची चाललेली ही तगमग ...गणपती आपला सुंदर दिसलाच पाहिजे त्याच्यासाठी रात्र दिवस जागून ते गणपती बनवत असतात त्याचा आकार त्याचा रूप त्याचा डोळे हे सगळे बोलके दिसले पाहिजे तरच त्यातली मजा असते.
मातीच्या गोळ्याला घडवताना त्यांना जे कष्ट पडतात त्याला तोड नाही आणि शेवटी त्यातलं देवत्व हे दिसायला पाहिजे ही चाललेली त्यांची प्रामाणिकपणाची तळमळ मला खूप भावून जाते .खूप सारे गणपती पाहिले कारखान्यामधले आणि त्याची वेगवेगळे आकार पाहून थक्क झाले.
किती गणपतीचे प्रकार आहेत नाही कोणी गणपती छोटासा बनवतोय कोणी मोठा बनवतो तर कोणी मध्यम आकाराचा कोणी उभा तर कोणी बसलेला कोणी सरस्वतीच्या बाजूचा तर कोणी लक्ष्मीच्या बाजूचा कोणी रिद्धी सिद्धी वाला तर कोणी उंदरावरचा तर कोणी मोरावरचा तर कोणाला विविध देवतांचे आकार शंकर-पार्वती बाजूला किंवा हातात त्रिशूल घेतलेला कोणी पाटी पेन्सिल घेतलिय तर कोणी हल्ली स्मार्ट आधुनिक मोबाईल घेतलेला.. लॅपटॉप वरती बसलेला ऑफिस मध्ये काम करणारा ..कोणी नृत्य करणारा तर कोणी गाणारा.
किती प्रकार किती वर्णन ...अपुरे आहे... सर्व देवांमध्ये मला वाटतं गणपतीच या सर्व रूपांमध्ये शोभून जातो आणि ते पाहायला आपल्याला सर्वांनाच आवडतं ...त्याच्यावर फिरवलेले रंगांचे हात एकमेकांना मिसळून सांगत असतील शेवटी आपल्याला पुन्हा एकदा मिसळून जायचं पाण्यामध्ये विरघळायचे त्याच्यामुळे आता आपण घट्ट एकमेकांना जपून राहू द्या आणि तो अखंड अभंग असा गणपती आपल्या घरी यायला वेळ लागत नाही त्याची ऑर्डर दिली जाते आधी बुक केला जातो आणि नंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आपल्या घरी त्याचा आगमन होतं .
नंतरचा सोहळा तर विचारूच नका पण तोपर्यंत बाप्पाला कधी बघतोय असं होऊन जातं म्हणूनच अशा गणपती बनवणाऱ्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये गेलं की मन हरखुन जातं.
त्याची विविधता मनाला थक्क करून जाते आपण आपलंच प्रतिबिंब त्या मूर्तीमध्ये कधीतरी शोधत असतो आणि म्हणूनच हल्ली गणपती भाजी आणणारे .मार्केटला जाणारे ..घरात काम करणारे दळण दळणारे असे पाहायला मिळतात. चुलीवर भाकऱ्या भाजणारे असे गणपती आहेत.
काही गणपती पुढाऱ्यांचे रूप घेतलेले . लोकमान्य टिळक सावरकर महात्मा गांधी बुद्ध यांची प्रतिकृती असलेले गणपती .कारागिरांच्या कलाविश्वाला सीमा नसते हेच खरं आणि तोच सुखकर्ता दुखहर्ता त्यांना ही शक्ती देत असावा ..मनापासून जीव तोडून काम करणारे असे कारागीर पाहिलं की खूप आतून सुखावून जातं पण या कारागिरांना फक्त गणपती बनवण्याचे कधीतरी काम असते फार फार तर दुर्गापूजन च्या दुर्गा देवीचे बाकीचे दिवस उपाशीच असतात. गणपती बनवण्यासाठी जागा घ्यावी लागते भाडं भरावे लागतं त्या मुर्त्यांसाठी जे काही सामान असतं त्याची तजवीज करावी लागते .
खूप कष्टाचे काम आहे दिवस-रात्र मेहनत केल्यावरती त्या गणपतीचं रूपड तयार होतं .आपण फार फार तर दीड दिवस सात दिवस पाच दिवस दहा दिवस गणपती किंवा जास्तीत जास्त 21 दिवस ठेवतो तेवढ्यापुरतं त्याला पाहतो आणि विसर्जन करतो .पण या कारागिरांच्या मनातला गणपती मात्र अखंड ध्यानी असतो.
जी काही मुर्त्या घडवून केलेली साठवण असते ती आयुष्यभर त्यांना पुरवावी लागते. हलाखीचं जगणं त्याच्या नशिबी असतं कधी कधी काही जण दुसरा जोड व्यवसाय करतात अशा मूर्ती बनवणाऱ्यांना समाजाने सढळ हाताने मदत केली तर त्यांच भविष्य उज्वल ठरेल गणपती बाप्पा मोरया
प्रतिभा बोर्डे

160 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad