Bluepad | Bluepad
Bluepad
सच है दुनियावालो के हम है अनाडी
प्रतिभा
6th Aug, 2022

Share

काही जणांना खूप असं दाखवायचं असत.
त्यांना स्वतःसाठी जगता येत नाही आपण कसे मॉडर्न फॅशनेबल... मराठी मध्ये आधुनिक
आणि सतत स्वतःला शो ऑफ करणं ट्रेंडी राहणं नाही जमत .लोक काही म्हणून देत अनाडी बुद्धु गावंढळ गावठी ..तरी ते आपल्याच विश्वात असतात.
हे राहणं चूक की बरोबर माहित नाही आणि काहीजण एकदम हाय क्लास सर्वच त्यांचं नखरेल .बिग बजेट फिल्म प्रमाणे .हाय फाय मॉल मधलं शॉपिंग ब्रांडेड कपडे ब्रांडेड चपला ब्रॅण्डेड पर्स ब्रँडेड शूज आणि ब्रॅण्डेड घरगुती सामान सर्वकाही ऑनलाईन किंवा मॉल.
त्यांना आठवड्याचे बाजार माहीत नसतात त्यांना भाजीपाला मार्केट कपड्यांचे मार्केट असं काही देणं घेणं नसतं त्यांना दाखवायचं असतं आपण किती पुढारलेलो आहोत. कुठलं चांगलं कुठलं वाईट नाही माहित पण प्रत्येक वेळेला दुसऱ्याला दाखवण्यासाठी जगण्यात मला तरी मजा वाटत नाही .
स्वतःला जर आवडत असेल तर जरूर तसं जगाव पण प्रत्येक वेळा मेकअपचे थर लावून म्हणजेच मुखवटे लावून जगणं हे काही मनाला पटत नाही .आहे ते नैसर्गिक जसं येईल तसं राहणं हेच आवडतं .
घराला टापटीत ठेवणं ते वेगळं पण घराचं हॉटेल प्रमाणे सजवणे हे काही पटत नाही घर हे घरासारखं असावं कधीतरी न आवरलेलं कधीतरी असंच अस्ताव्यस्त असतं मग ते कुठल्यातरी सणाला किंवा पाहुणे येणार त्यावेळी आवरायला मज्जा येते .
पण रोजच घर छान ठेवायचं???
नीटनेटकं ठेवणं वेगळं आणि त्याचा एकदम मॉडेल म्हणजेच कृत्रिम लूक ठेवणं वेगळं
.घर घरासारखं असावं .
बाजारात गेल्यावरती खूप प्रकारच्या भाज्या बघायला मिळाव्यात .
विकणाऱ्यांची बोलीभाषा .त्यांच्याबरोबर किमतीसाठी केलेली थोडीफार बाचाबाची आणि किती गर्दी वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे सामान हे सगळं आठवड्याच्या बाजारात पाहायला खूप आवडतं ..म्हणूनच मॉल मधून मी दबून जाते कारण काहीतरी तिकडे हरवल्यासारखं वाटतं.
केव्हातरी हौस म्हणून मॉल मध्ये जाणं वेगळं. पण रोजच रोजच्या खरेदी साठी जाण योग्य नाही वाटत. वाणी सामान घेताना बनवलेली लिस्ट आणि त्याला हजार वेळा सांगून काहीतरी तो विसरलेलं किंवा वेगळ काहीतरी टाकलेलं आणि मग त्याच्याबरोबर आपल्याला कसा वाद घालता येतात हे आठवलं आणि ही मजा मॉलमध्ये नाही म्हणजेच पुन्हा तो हायफाय पणा आड येतो आणि जगण्यातला जिवंतपणा घालून टाकतो.
प्रत्येक वेळा मी कसं स्मार्ट आहे हे दाखवण्यासाठी चाललेली जीवाची धडपड पाहून मला खूप हसू येतं.
माणसाचा स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेला आहे .जीवनाचं राहणीमान पद्धत.. नको असलेल्या वस्तू घरी आणणे कपड्याला तर तोटाच नाही आवडलं की घ्या आवडलं की घ्या .त्याच्यामुळे सणांना नवीन कपडे घालण्याची मजा नाही.
शॉपिंग शॉपिंग शॉपिंग याला कसलाच आवर नाही .कुठे चाललोय आणि आपणच नव्या पिढी वरती संस्कार करतोय की तुला पाहिजे ते मी देते. त्याच्यासाठी त्याला हट्ट करावा लागत नाही किंवा फुरगटुन बसावं लागत नाही काही गोष्टी तर न मागताच मिळून जातात पुन्हा एकदा सतत पैशाची उडवा उडवी आणि कुणाचं तरी अनुकरण करून जगण्याची धडपड.
खरच कुठे चाललोय आपण??
सच है दुनियावालो के हम है अनाडी
प्रत्येक वेळेला ब्रँडेड वस्तू वापरायलाच पाहिजे का ??
प्रत्येक वेळेला खूप ट्रेंडी दिसायलाच पाहिजे का??
प्रत्येक वेळेला मुखवटे घालून मेकअपचे थर लावून जगायलाच पाहिजे का ??
प्रत्येक वेळेला स्मार्ट दिसणं आवश्यक आहे का??
असं असेल तर राहू दे.
सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी
सच है दुनियावालो की हम है अनाडी
प्रतिभा बोर्डे

170 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad