कागल तालुक्यातील आणि घोडेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत असणाऱ्या निपाणी देवगड राज्यमार्गावर असणाऱ्या कुरुकली सारख्या छोट्याश्या खेड्यातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारीपूर्वक कार्यभार सांभाळणारे आपल्या भागातील जवळचे श्री.विकास हांबिरराव पाटील. आज विकास पाटील यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या बद्दल चार शब्द लिहावेसे वाटले. तस पाहायला गेलं तर विकास पाटील यांना जरी पूर्वीची राजकीय पार्श्वभूमी असली तरीसुध्दा आज त्यांनी आपल्या मेहनतीवर आणि लोकांची कामे निस्वार्थीपणे केल्याबद्दल माजी मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांना कागल तालुक्याची पक्षाची संपूर्ण जबाबदारी दिली. विकास पाटील यांनी सुद्धा ती जबाबदारी अगदी अपेक्षेपलीकडे, उत्साहपूर्वक आणि नव्या उमेदीने सांभाळली व आजही सांभाळत आहेत.त्यांनी फक्त आपल्या गवापूर्ते मर्यादित काम न करता तालुक्यातील गोर गरीब जनतेची कामे मुश्रीफ साहेबांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा करून केली. यामध्ये निराधार,किंवा विधवा पेन्शन असेल किंवा मुंबईला गोर गरीब जनतेतील बऱ्याच लोकांना मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये विविध अशी महागडी ऑपरेशन्स अगदी मोफत करून दिली. आज त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सौ.अर्चना ह्या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून बिद्री कारखान्यात संचालिका म्हणून काम करतात. विकास यांचे वडील एकेकाळी बिद्रीचे संचालक होते, त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे धाकटे भाऊ सयाजीराव पाटील यांना बिद्रिचे संचालक पद देवून दिवंगत खासदार मंडलिक साहेबांनी कुरुकळी या खेड्याला न्याय दिला. दिवंगत हांबिरराव पाटील यांच्या निधनानंतर कागल तालुक्याच्या राजकारणात एक उणीव भासत होती ती ठरल्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव विकास यांच्या रूपाने भरून निघाली आणि ही उणीव भरून काढण्यासाठी नेत्यांनी विकास पाटील यांना जो शब्द दिला होता तो त्यांनी तंतोतंत पाळला. अगदी ग्रामपंचायती पासून विकास यांनी तालुक्याच्या अध्यक्ष पदापर्यंत आपल्या कर्तुत्वाने उंच झेप घेतली. विकास यांचा स्वभाव मनमिळाऊ, शांत,संयमी आणि मितभाषी असल्यामुळे लोकं आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात,त्यांनी आपल्यासोबत अगदी युवकांची भली मोठी फळी तयार केली आहे. जुन्या थोर लोकांच्या विचारांची आणि तरुण युवक ,युवतींच्या नवीन विचारांची योग्य सांगड घालून ते समाजकारण आणि राजकारण असा समतोल सांभाळतात.त्यांच्या या गुणांमुळेच माजी मंत्रीमहोदय मुश्रीफ साहेबांनी विकास पाटील यांच्यावर आपल्या राष्ट्रवादी पक्षाची कागल तालुक्याची धुरा सोपवली. ही जबाबदारी विकास, हे पक्षाची प्रगती आणि नीतिमूल्ये यांच्यासंदर्भात तडजोड न करता निश्चित वाखनन्याजोगी सांभाळतील असा दृढ विश्वास साहेबांचा होता आणि विकास यांनी सुद्धा तो अतिशय कौतुकास्पद सांभाळला आणि सांभाळत आहेत. त्यांच्या हातून अजून अशी बरीच कामे व्हावित आणि राजकीय व सामाजिक विश्वाच्या जगात अजून उंच उंच गरुड भरारी घ्यावी हीच घोडेश्र्वर चरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा विकास पाटील यांना त्यांच्या वाढदिनी कोटी कोटी शुभेच्छा.....🙏🙏🙏
लेखन : श्री.दत्तात्रय के पाटील,गलगले