जुळती धागे सुखाचे कुठे कसे कधी
थांबताना क्षणिक आजीवन पटलावर
नाते मैत्रीचे असले आपुले किती तरी
गीत गातो तुझेच मी सुरांच्या तालावर
तू नसता सोबत फिरकत तुझ्यापाशी
जवळ हुंदडतो असा तुझ्या पावलावर
लाजरी साजरी गोजिरी खाण रूपाची
गजरेमधूनी लाली सुवासिक फुलावर
थोडं तुझं थोडं माझं म्हणुनी मैत्रेयेत या
उलगडावी मने वाऱ्याच्या प्रीत झुलावर
करीत सांगता सखये एक नव्या पर्वाची
हलकासा कवडसा यावा प्रेम मोहलावर
- नयन धारणकर,नाशिक