Bluepad | Bluepad
Bluepad
पारिजातचे आयुष्य
Aishwarya
Aishwarya
5th Aug, 2022

Share

पारिजात वेचताना मनात आलेले विचार... आयुष्य हे पारिजात प्रमाणे असावे, दीर्घायुषी नसले तरी निर्मळ शुभ्र असावे. त्याला दिवसा उमलता येत नाही म्हणुन तो कधी खंत करत नाही याउलट तो रात्रीला आपलंसं करतो. कोणी म्हणत रात्रीला फक्त चंद्राची साथ असते पण कधी कधी अमवस्येला तो चंद्र ही लुप्त असतो. पारिजातकाला अमावस्या पौर्णिमा काहीच माहीत नसत त्याला मात्र बहरण माहीत असत. रात्री बहरून त्या रात्रीला आपलंसं करणारा तो पारिजात सकाळी माझ्या ओंजळीत दिलखुलास बहरतो. ओंजळीतील पारिजात कधी सुगांधने हृदयापर्यंत पोहचतो तर कधी सुगंधीरूपी शब्दांनी मनात दरवळत राहतो.
✍️ऐश्वर्या
पारिजातचे आयुष्य

181 

Share


Aishwarya
Written by
Aishwarya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad