नमस्कार मित्रांनो, आज मुद्दाम असा विषय निवडला आहे ज्याकडे तुमच लक्ष केंद्रित होईल. पण माफ करा मी मासिक पाळी बद्दल बोलणार नाही. तर मासिक पाळी हा शब्द उच्चारले कि तुमच्या माझ्या मनाची होणारी परिस्थिती यावर जरास बोलाव वाटत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील एका शाळेत ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे अशा मुलींनी वृक्षरोपणास येऊ नये अस सांगण्यात आले. यावर मुलीने प्रश्न केला तर तिला उत्तर मिळाली कि, मासिक पाळी असलेल्या मुलीने वृक्षारोपण केल्यास झाड जगत नाही. ही गोष्ट एका शाळेत घडते हे विशेष,जेथून वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला जायला हवा अशा विद्येच्या मंदिरात अशा थोतांड गोष्टी ना वाव मिळावी या गोष्टी चा राग आला म्हणून आज जरास बोलाव वाटल. पण अशातच एक नाशिक जिल्ह्यातील च बातमी वाचली की, मासिक पाळी असलेल्या काही मुलींचा सन्मान करण्यात आला. तेव्हा मात्र वाटल कि, पुर्ण पणे मानसिकता बदलायला वेळ लागेल पण एक दिवस ही मानसिकता नक्की बदललेली असेल.