Bluepad | Bluepad
Bluepad
♥️थँक्स आणि सॉरी ♥️
Vikas chavan
Vikas chavan
5th Aug, 2022

Share

♥️जीवनात थँक्स आणि सॉरी का?????
आपल्याला अनेक चांगल्या सवयी असतात त्यात आणखी एक चांगली सवय लावून घ्या.....थँक्स आणि sorry ची.... तुम्हाला ठाऊक आहे का इवल्याशा दोन शब्दाने काय फरक पडतो....
एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण सुरू होते. बायको कधी नव्हे ते मोठमोठ्यांने ओरडत होती. आधी नवराही खूप रागावला पण तो विचार करू लागला की आपली बायको कधीच उलटून बोलत नाही पण आज एवढा पारा का चढलाय????ती बोलत होती , त्याने तिला मध्येच थांबवत सॉरी म्हटले, काय बोलता एक मिनिटात तिचा राग निवळला व ती अगदी नॉर्मल होऊन सांगू लागले, आज ऑफिस मध्ये बॉस विनाकारण ओरडले त्यामुळे माझी चिडचिड झाली....
उदाहरण दुसरे घ्यायचे झाल्यास एकदा मी सहज भाजी आणायला गेलो . भाजीवाला ओळखीचा नव्हताच आणि मला भाजी कशी घ्यावी एवढी समज देखील नव्हती... मी त्यांना फक्त एक बोललो ,, काका तुम्ही आमच्यासाठी एवढ्या दूरवरून भाजी घेऊन येता त्यासाठी थँक्स हा.. त्यांच्या दिवसभर फिरून दमलेल्या चेहऱ्यावर एक गोड स्मित आले आणि स्वतःच भाजी निवडून माझ्या हातात दिली आणि थँक्स च्या बदल्यात ते मला म्हणाले,
इट्स वेलकम पोरा .......
इवलेसे दोन शब्द जादू सारखे काम करतात. विश्वास नसेल बसत तर दवाखान्यामध्ये स्वीपर फरशी पुसत असताना आपण पाय दिले तर त्याला सॉरी म्हणून बघा, कचरा घेऊन जाणाऱ्या काकांना थँक्स म्हणून बघा, खूप छान वाटतं. .......म्हणून हि सवय अंगळवणी पाडून घ्या.....कारण हे दोन शब्द चेहऱ्यावर आनंद देतात आणि सगळा शीण काढूनही घेतात....
मी तर सवय पाडून घेतली थँक्स आणि सॉरी ची आणि तुम्ही??????
- विकी
♥️थँक्स आणि सॉरी ♥️

189 

Share


Vikas chavan
Written by
Vikas chavan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad