Bluepad | Bluepad
Bluepad
पत्रकारिता चौथा स्तंभ की सत्ताधारीचा कणा...📰🗞️
नागरिक_4u
नागरिक_4u
5th Aug, 2022

Share

पत्रकारिता चौथा स्तंभ की सत्ताधारीचा कणा...📰🗞️
पत्रकारिता ही मानवी जीवनात अतिशय महत्वपूर्ण बदल घडवत असते . जेवढे महत्त्व मानवी जीवनात अग्नी आणि चाकाच्या शोधाचे आहे तेवढेच महत्त्व प्रबोधन काळात आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारितेचं होतं मात्र हा झाला पत्रकारितेचा इतिहास पण आज देशात व जगात पत्रकरिता ही प्रबोधन सोडून लोकांचे जीवन सुखकर करण्यापेक्षा दुःख कर करण्यास जास्त आतुर आहे....
पत्रकारितेचे उद्दिष्ट मानवाला प्रबोधन करण्याचे आहे मानवाला घडत असलेल्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून देण्याचे आहे ते सोडून आज पत्रकारिता मानवी जीवनात अडीअडचणी निर्माण करण्यात जास्त उपयोगी पडताना दिसत आहे . पत्रकारिता ही निष्पक्ष असणं लोकशाहीसाठी व मानवासाठी अतिशय महत्त्वाचं आहे पण असं होताना आज फारच क्वचित दिसतं आणि हेच मानवासाठी फार धोकादायक ठरत आहे .
पत्रकारितेचे दोन प्रकार आज महत्त्वपूर्ण आहेत एक वृत्तपत्रांच्या माध्यमातून तर एक डिजिटल माध्यमातून जे आपल्याला न्यूज चैनल च्या स्वरूपात दूरचित्रवाणी वरती पाहायला मिळतं . वृत्तपत्रांच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या यांच्यावर तरी आपण थोडाफार विश्वास करू शकतो पण डिजिटल माध्यमातून प्रसारित होणारी पत्रकारिता ही तर एखाद्या गटारीच्या पाण्यापेक्षाही जास्त अशुद्ध म्हणायला हरकत नाही . प्रत्येक दिवशी त्यांचा तमाशा चार वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत चालू होतो त्यांनी बोलावलेले तज्ञ आणि त्यांनीच बोलवलेले विशिष्ट पक्षाचे लोक येतात आणि आपली मतं देशावर थोपून जातात आणि लोकांना वाटतं की हेच सत्य... मात्र वास्तविकता त्याच्या उलट असते...
दूरचित्रवाणी वरून प्रसारित होणाऱ्या न्यूज चैनल वरती हेडिंग अशा असतात जसे की खरंच पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ...त्यात काही देश की बात , हल्लाबोल , पूछता है भारत , डीएनए , भारत की बात असे अनेक दिशाभूल करणारे मथळे देऊन बिंदास चाटू कारीता केलेली असते... माननीय सुप्रीम कोर्टाने ही आता सांगितले की कोर्टात केस येण्या अगोदरच पत्रकार चर्चांमधून न्याय करण्यास आतुर असतात आणि हे न्यायप्रणालीसाठी अतिशय धोकादायक आहे मात्र चाटूकारपत्रकारांना ते समजतच नाही ते त्यांच्या त्यांच्या धुंदीत असतात मालकाने जसं सांगितलेलं असतं तसं चालवायचं आणि तेच दाखवायचं आणि आपलं कल्याण करत राहायचं कारण त्यांना ईडीचं , सीबीआयचं सर्वांच संरक्षण प्राप्त असतं पण जर कोणी आवाज उठवला सरकारविरुद्ध लगेच त्याचा आवाज दाबायचा मग हे आता का , असंच का , तेव्हा का नाही अशा पद्धतीने जनहिताचे डावलून त्यांचे कार्य चालू देतात यातूनच सिद्ध होत की त्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ सोडून दिला व सत्ताधारी पक्षाचा पाठीचा कणा बनवून काम करण्यास समाधान मानले आहे...
जे दिसत ते खर नसत.... यावर लोकांनी एक वेळा विचार करायलाच हवा आणि चिंतन करून यावर काय खरं नी काय खोटं याचा योग्य तो अभ्यास करायला हवा... देशाच्या उन्नतीसाठी सत्य काय हे प्रत्येक नागरिकाला माहीत असणं महत्त्वाचं आहे आणि हे माहिती करण्याचं काम माध्यमांचे आहे पण जर माध्यमच त्यांचं कर्तव्य पार पाडत नसतील तर खरंच हे देशासाठी आणि एक नागरिक म्हणून प्रत्येकासाठी धोकादायक आहे याचा विचार करण्याची गरज आहे...
राजनिती ही कधीही शुद्ध असू शकत नाही पण पत्रकारिता जर राजनीतिक बनत गेली तर मग लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर पत्रकारिता विश्वासाचे सर्वात मोठे साधन आहे आणि जर पत्रकारिता पक्ष - विपक्ष यात वाटली गेली तर मग देशात सत्य काय आणि असत्य काय यात फरक उरणार नाही... पत्रकारिता ही निष्पक्षच राहिली पाहिजे आणि नेहमी देशाच्या कायद्यानुसारच व पत्रकारितेच्या तत्वानुसार तिने न्याय पद्धतीने योग्य ती माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे . यातच देशाचं आणि प्रत्येक नागरिकाचे हित आहे नाहीतर बस मग फक्त सत्यानाश आहे...

237 

Share


नागरिक_4u
Written by
नागरिक_4u

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad