Bluepad | Bluepad
Bluepad
" पाठीराखा "........
Rohini pote
Rohini pote
5th Aug, 2022

Share

भाग - 3
( चर्चा करत करत कधी एकदा घरी पोहचता कळत पण नाही . रमेश संजयच्या घरी न येताच त्याच्या त्याच्या घरी जातो )
( संजय थोडा चिंतेतच असतो म्हणून घरी येऊन सोफ्यावर गुपचूप बसून घेतो . )
" अहो , तुम्ही कधी आलात आणि रमेश भाऊजी नाही आलेत का ? " - राधाबाई
" नाही . तो तसाच त्याच्या घरी गेला . " - संजय
राधाबाई पाणी घेऊन येत म्हणता - " काय हो , खूप टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही . काही झाल का ? "
" नाही , नाही तसं काही नाही झाल . " - संजय
" मग अहो तस नाही तर कस, तुम्ही तर आताच टेन्शन मध्ये दिसत आहात .मला तुमच्याशी जरा बोलायच होत . " - राधाबाई
" काही टेन्शन मध्ये नाही . बोल . तुला काय बोलायचय असेल ते ." - संजय
" मला ना सोनु विषयी बोलायच होत . " - राधाबाई .
" मला देखील तेच बोलायच होत .मी डॉक्टर कडे जाऊन आलो . त्यांच्या बोलण्याने तुरतास तरी भीती वाटतीय ग मला " - संजय
" म्हणजे डॉक्टर नेमके काय म्हणाले ? " - राधाबाई
" हो , ते सांगतो . पण सोनु कुठय आता . काय करतेय . " - संजय
" मी तिला जरा फ्रेश व्हायला लावल होत आणि मग थोडासा नाश्ता वैगरे देऊन आराम कर म्हटल . पियू पण आहे तिच्या सोबत काही तरी खेळत असतील बहुतेक बसल्या बसल्या . " - राधाबाई
" बर , मला तिच्याशी जरा बोलायच आहे . " - संजय
.
" ती जागीच असेल बहुतेक बोलायचा आवाज पण येतोय . चला , बरं काय बोलायच बोला लवकर ! " - राधाबाई जरा वैतागुनच म्हणाल्या .
" हो , तु चल आलोच मी " - संजय
(राधाबाईच्या पाठोपाठ लगेचच संजय देखील जातो . )
" पियू काय करताय ग तुम्ही . खुपच दंगा चालालाय हं पियू तुझा " - पियुच्या हसण्याच्या आवाजाने राधाबाई आत जाता जाताच म्हणाल्या .
" आई काही नाही ग असच मस्ती करत होतो . ग " - सोनु
( तेवढ्यात तेथे लगेच संजय येतो )
" खोट हसु तोंडावर आणत काय सोनु टकाटक ना एकदम !" - संजय
" हो , बाबा एकदम मस्त ! आहे मी . पण हात पाय थोडे थोडे दुखतायत " - सोनु देखील चेहर्‍यावर स्माइल आणत बोलली .
" काही नाही राहून जाईल हळू हळू , आराम कर फक्त . " - संजय .
" सोनु तुला रात्री काय झाल होत समजल का ? म्हणजे तु आजारी झाली त्या आधी काही समजल , की तुला काही होतय किंवा तुला दवाखण्यात नेल तेव्हाच काही आठवत का ? " - राधाबाई
" नाही मला काहीच नाही आठवत . मला काय झालं होत तेच नाही माहित . पियूला विचारलं ती पण नीट सांगेना . जेव्हा मला उलटी झाली , तेव्हा कुठं समजल आपल्याला काहीतरी झाल आहे. " - सोनु
" मला वाटल तुला समजत असेन . थोडतरी . " - संजय
" नाही हो बाबा मला काहीच नाही समजल , पण आता तुम्ही सांगा ना मला काय झाल होत नेमक . मी कशी आजारी झाले होते . " - सोनु
" नको ग तु ऐकुन काय करणार आहे आता . " - राधाबाई
सोनु जरा हट्ट धरून म्हणते - "बाबा सांगा ना लवकर , मला ऐकायच आहे "
( राधाबाई इशार्यानेच सांगायला नको म्हणता , पण सोनुच्या हट्टापुढे संजय पण ऐकत नाही . आता सांगतोच थांब नेमक काय झालं होत हिला . )
" तर मग ऐकच . रात्री तुझी दातखीळ बसुन तोंडाबाहेर रक्त येत होत . हात पाय आपटत होतीस . आणि विचित्र असा आवाज पण काढत होती . " - संजय .
" मग तुम्हाला कधी समजल , मला कस तरी होतय म्हणून ." - सोनु .
" आम्ही उठण्या अगोदर रश्मीला तुझा आवाज आला , मग तिने आम्हांला सगळ्यांना आवाज देऊन सांगितल , की तु कस तरीच करतेय म्हणून तेव्हा कुठ आम्ही धडपडून उठलो . लाईट लावली तर तू खुपच कसतरी करत होती . " - राधाबाई
( सोनु सर्व काही एकटक बघुन आश्चर्याने ऐकत होती . )
" आणि हो एवढच नाही , तर तु काही केल्या तुझे हातपाय आपटण्याची हालचाल बंद करेना म्हणुन रमेश काकांची गाडी बोलवून दवाखान्यांत सुद्धा नेल . जेव्हा मग डॉक्टरने तुला इंजेक्शन दिल . तेव्हा तू शांत झाली आणि घरी आल्या नंतर पहाटे चार वाजताच तु शुद्धीवर आली . गोळ्या घेऊन झोपल्यावर मग सकाळीच उठलीस . " - संजय
" कळल का आता काय झाल होत ते तुला. " - राधाबाई
" हो आई , समजल. पण मला अस का झाल असाव . " - सोनु .
" माहीत नाही , बाळा . आपण कुठ कमी पडलो ते , की देवाने तुला असा त्रास दिला . " - राधाबाई
" आई आता मला कायम कायम अस होईल का ग . " - सोनु .
" अग सोनु , डॉक्टरलाच नाही माहीत . तर आम्ही कुठुन सांगणार .. " - संजय .
" आणि काय हो तुम्ही आणि रमेश भाऊजी गेला होतात ना आज डॉक्टरांकडे . मग काय म्हणाले , डॉक्टर ." - राधाबाई .
" डॉक्टर म्हणाले , की मी लगेच काही सांगू नाही शकत . अस परत होईल किंवा नाही , कधी होईल . पण त्यांनी आणखी काही डॉक्टर सोबत चर्चा केली , तर त्यांच अस म्हणण आहे , की मेंदूला कमी रक्तपुरवठा होत असल्याने अस होऊ शकत . त्यासाठी सीटी स्कॅन करण गरजेच आहे . " - संजय .
" मग हो आता . आपल्याला सीटी स्कॅन कराव लागेल का सोनुच . " - राधाबाई
" बघू ना आता काय होतय पुढे . " - संजय .
" मी काय म्हणत होते . कालच मोठी अमावस्या होती आणि आपली सोनु पण कालच आजारी झाली, तर मग आपल्या सोनुला काही बाहेरच तर नसेन ना . " - ( राधाबाई जरा अडखळतच बोलल्या . )
" काही पण काय बोलतेस . अस बाहेरच वैगरे काही नसत . आणि आपल्या सोनुला अस काही होऊ शकत नाही . " - संजय .
"अहो , पण बरेच लोक असच म्हणत होते की काही बाहेरच असेन म्हणून . " - राधाबाई .
" काही का असेना पण माझ्या सोनुला मी पहिले दवाखन्यातच नेणार . " - संजय जरा इमोशनल होत म्हणाला .
" बाबा आज मला शाळेत जायच होत आज पण नाही गेले , आणि परत दवाखान्यात गेल्यावर माझी खूप दिवस शाळा बुडेल . नाही , मी उद्या शाळेत जाणार . " - सोनुने हट्टच धरला .
" बर ठीक आहे . उद्या तु शाळेत जा . पण आज तु पूर्ण वेळ आरामच करायचा . चालेल का ! " -संजय
सोनु खुश होत - " हो बाबा , नक्कीच . आज आराम करेन . पण उद्या नक्की शाळेत जाणार म्हणजे जाणार . " - सोनु
( सोनु ही आठवीत शिकत होती . खूप हुशार होती पण थोडी जिद्दी आणि हट्टी होती . ती कधीही शाळा बुडवत नसल्याने आज तिला खूप वाईट वाटल होत . )
(शाळेत जाण्यासाठी आज तिने आराम केला . आणि तिला बऱ्यापैकी आराम पडला होता . त्यामुळे रात्री तिने तिच्या मैत्रिणीला फोन करून अभ्यास विचारला . आणि सर्व अभ्यास पूर्ण केला . आणि मग निवांत झोपली. )
(सकाळी उठल्या बरोबर तिने शाळेत जायची तयारी सुरु केली . )
" सोनु पण वेळेवर जेवण कर आणि काळजी घे जरा स्वतःची " - संजय
" हो बाबा . नक्की . " सोनु .
" आई अग माझा डबा झाला का बनवून . मला उशीर होतोय शाळेत जायला . " - सोनु .
" हो ग बाई झाला आहे . किचन वर ठेवला आहे . घे ना तिथुन . " - राधाबाई .
" रश्मी तुझ आवरल का ग . चल लवकर . " - सोनु .
" हो , सोनु ताई आवरल ग चल . " - रश्मी .
( दोघीही शाळेत जातात . )
( असाच दिनक्रम 3 - ४ दिवस चालू असतो ) .
क्रमशः
.......................
.......................
.......................

177 

Share


Rohini pote
Written by
Rohini pote

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad