नकोत चांदणे निळ्या नभाचे नकोत चंद्र मजला
नको कळ्या नको फुले ती नको तो चंद्र विझला
निखळले तारे नभीचे आठवांचे झाले विरहगाणे
अर्थ ना उरला जीवनाशी आसवात चंद्र भिजला
झालेत शांत दूरचे दिवे अन किनारी निशांत वारे
धरेच्या कुशीत दूर तिथे का एकटाच चंद्र निजला
हरपले जिथे गंध सांज फुलांचे दूर नभाच्या तळी
हरवले आकाश सारे अन हा वेदनेत चंद्र झिजला
काढलीत चित्र मी माझ्याच जखमांची तु दिलेली
केली किती प्रतीक्षा अंती ना भेटला चंद्र तिजला
डॉ. राजू श्रीरामे
भ्रमणध्वनी : 9049940221