Bluepad | Bluepad
Bluepad
अंतर्मन
Rajani Nikalje
Rajani Nikalje
5th Aug, 2022

Share

अंतर्मन
तिची कुठलीच अपेक्षा नसते
तो तिला देतो एक बिस्तर
त्याच्या अतृप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी
ओरबाडून टाकतो तिचं आयुष्य
तिला देतो एक घर आयुष्य घासण्यासाठी
तिची होते राख जळताना चुली समोर
आटते तिच रक्त त्याचा वंश
गर्भाशयात संभाळतांना
ती सहन करते त्यांचे प्रत्येक नखरे
तो तिला करू पाहतो पराभूत शक्तीने
तो सिद्ध करतो त्याचं पुरूषत्व
वेळो वेळी देतो मर्दानगीचे दाखले
तरी ही तो जिंकू शकत नाही
तिच्या अंतर्मनाला
तो जिंकू शकत नाही तिचं प्रेम
तो जिंकू शकत नाही तिच्यातील स्त्रीला
कारण तिच अंतर्मन हे अजय असत
तिला पराजित करणे ऐवढे सोपे नाही......
रजनी निकाळजे
मीरारोड, मुंबई
अंतर्मन

187 

Share


Rajani Nikalje
Written by
Rajani Nikalje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad