मित्रांनो साप म्हटला कि प्रत्येकाला भीती वाटते त्यातच जर अजगर म्हटला तर आठवतो अॕनाकोंडा या चित्रपटाततील १५ फुटाचा अजस्त्र साप.
मुळात हा आला बिनविषारी सापांच्या जातकुळीतील पण भक्ष पकडण्याच्या नैसर्गिक पद्धतीने हा बदनाम आहे. हा बोजड आणि आळशी जरी असला तरी भक्ष पकडण्यातली चपळता वाखाणण्याजोगी आहे. प्रथम हा भक्षावर झडप घालून पकडतो नंतर त्याला वेटोळी घालुन आवळतो त्यामुळे भक्षाची हालचाल मंदावते व श्वास न घेता येण्यामुळे तो मरण पावतो.
त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजुने गिळायला चालू करतो. त्यामुळे भक्षाच्या शिंगाचा किंवा पायाचा काही अडचण हौत नाही. एकदा हरणासारखे भक्ष खाल्यानंतर अजगराला किमान सहा महिने न खाता काढतो.
विविध भागात अजगराच्या बरयाच प्रजाती आढळतात. भारतात पायथॉन मोलुरस प्रजातीचे अजगर सापडतात.
शब्दांकन
किरण सरजिने.