Bluepad | Bluepad
Bluepad
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
M
Milind Gaddamwar
5th Aug, 2022

Share

राज्य घटनेचे कलम 19 मध्ये अनेक प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे.कलम 19 -1(अ) मध्ये भारताच्या नागरिकांना भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे.कुणाची टिंगलटवाळी किंवा पान उतारा करण्यासाठी नाही.तर आपले मत,बाजू प्रखरपणे समाजासमोर,प्रसार माध्यमांसमोर, कुटुंबातील सदस्यांसमोर, मित्रमंडळींमध्ये,कोर्टात मांडण्यासाठी दिलेले आहे.
निसर्गाने मनुष्य प्राण्याला अभिव्यक्त होण्यासाठीच तोंड दिलेले आहे. सुमधूर आवाजाची निर्मिती करण्यासाठी कंठाची व जिभेची रचना केलेली आहे.
जिभेचा वापर चांगल्या रीतीने केला गेला तर यातून
यातून आनंदाची अनुभूती येते.चुकीच्या पध्दतीने केला गेल्यास याचे वाईट परिणाम स्वतःला व समाजाला भोगावे लागतात.
जिभेवर संयम ठेवणे गरजेचे आहे. अनेकांना हे कृत्य करणे अवघड जाते.यामुळे प्रचंड वादावादी होते.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात.यामुळे मनातील कटुता वाढीस लागून एकमेकांबद्दलचा असणारा आदर हा कमी होत जातो.ते एकमेकांना पाण्यात पाहायला लागतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मनमानीपणे वागण्याची मुभा नाही.तर मनुष्याची वागणूक ही काही निसर्गदत्त नियमांचे पालन करून आदर्शवादी समाज निर्मितीसाठीचे प्रयत्न करण्यासाठीची असली पाहिजे.
‌* मिलिंद गड्डमवार, राजुरा
मो.क्र.9511215200

240 

Share


M
Written by
Milind Gaddamwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad