कधी कधी फक्त शांत राहायच
होणाऱ्या गोष्टी होऊ द्यायच
एवढच आपल्या हातात असते
काही प्रश्न असे येतात आयुष्यात की
त्यांचावर आपल्याकडे काहीच उत्तर नसते
अशा प्रश्नांकडे जास्त लक्ष नाही द्यायच
या × च गणित वेळेवर सोपवायच
वेळेमध्ये खूप ताकद आहे
सगळ कळत कधी काय करायच
निरुत्तरपणे blank होउन बसण्यापेक्षा
Skip करुन पुढचा प्रश्न बघितला तर?
थोडाफार सोपा जाईल ना life चा पेपर?
कारण कसंही प्रश्नांना काहीच तोटा नाही इथ तर
जेवढ येतय तेवढ सोडवू या कि
नंतर राहिलेल्या वेळेत पुन्हा असले trick question
घ्यायचे आणि ते तेव्हा सुटतात ही
कारण आपल्याला तर माहीतच आहे
वेळेमध्ये खूप ताकद आहे......
-वैष्णवी झुंजारे❣