Bluepad | Bluepad
Bluepad
सत्ता (अधिकार ) प्राप्तीची ४८ सूत्रे
Aarya
Aarya
5th Aug, 2022

Share

48 लॉज ऑफ पॉवर या इंग्रजी पुस्तकाचे लेखक रॉबर्ट ग्रीन आहेत . त्याचा हा मराठी भाषेतील सारांश आहे. सत्ता म्हणजे फक्त राजकीय सत्ता किंवा अधिकार असा मर्यादित अर्थ नसून आपला व्यवसाय आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
एकूण ६ भागांमध्ये ४८ सूत्रे प्रकाशित केली जातील . काही सूत्रे खूपच बेधडक आहेत , सर्वजण सहमत असतीलच असे नाही. ही सत्तेची सूत्रे हातात घेण्यासाठी नियम / सूत्र बघूया  ...!

सूत्र १ : आपल्या वरिष्टांपेक्षा जास्त चमकू नका .
तुमच्या वरिष्टांपेक्षा हुशार दिसण्याचा कधीही प्रयत्न करू नका . त्यातून वरिष्ठाना येणारी असुरक्षिततेचि  भावना तुम्हाला धोकादायक ठरू शकते .

सूत्र २ : आपल्या मित्रांवर विसंबून राहू नका , शत्रूंचा वापर करायला शिका .
तुमच्या मित्रांना तुमचा हेवा वाटू शकतो आणि ज्याचे रूपांतर धोका देण्यामध्ये होऊ शकते . तुमचे जुने शत्रू तुमच्या नवीन मित्रांपेक्षा अधिक चांगले असू शकतात . जर तुमचे शत्रू नसतील तर शत्रू बनवण्याचा मार्ग शोधा कारण ते महत्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की "निंदकाचे घर असावे शेजारी"!  निंदक जेव्हा शेजारी असतो तेव्हा तो आपल्यावर सतत पाळत ठेवून असतो आणि आपल्या अहंकाराला मधून मधून टाचणी लावून आपला फुगा फोडत असतो. म्हणजेच आपल्या परखड मूल्यमापनाला तो मदत करत असतो.

सूत्र ३ : तुमचे अंतस्थ हेतू लपवून ठेवा.
आपल्या मनातील हेतू लोकांना सांगू नये किंवा समजू देऊ नये , ते समजले तर तुमचे शत्रू जागरूक होतील . लोकांना अंधारात ठेवण्याचा अर्थ आहे ते स्वतःची योजना तयार करू शकणार नाही .

सूत्र ४ : आवश्यकतेपेक्षा कमी बोला .
लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही जास्त बोललात तर तुम्ही खूपच सामान्य आहात हे लक्षात येईल . अधिक बोलून जास्त चौकशी करण्याची संधी मिळते आणि एखादी नकोशी गोष्टसुद्धा तोंडातून निघू शकते .

सूत्र ५ : नाव आणि पत -प्रतिष्टेवर सर्वकाही अवलंबून असते , प्राणपणाने त्याचे रक्षण करा .
व्यक्तीची शक्ती त्याच्या नावावरून आणि प्रतिष्टेवर टिकलेली असते . जर तुमचं नाव मजबूत असेल तर तुमच्यामध्ये प्रभावशाली व्यक्ती असते. जर नाव मजबूत नसेल तर सोप्या पद्धतीने लोकांच्या जाळ्यात ओढले जाता आणि स्वतःवर हल्ला करण्याची संधी सुद्धा देता .

सूत्र ६ : लोकांचे लक्ष वेधून घ्या .
गर्दीमध्ये वेगळे दिसण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनासारखे लक्ष वेधून घेण्यासाठी बोलण्यामध्ये थोडे रहस्य बनवून ठेवा .

सूत्र ७ : लोकांना तुमच्यासाठी काम करू द्या .त्याच श्रेय मात्र तुम्हीच घ्या.
लोकांजवळ ज्ञान , बुद्धी ,प्रतिभा ,कौशल्य यासारख्या  अनेक गोष्टी आहेत. आपण ती काम नाही केली पाहिजेत जी इतर लोकसुद्धा करू शकतात. दुसऱ्यांकडून कामं करवून घेऊन स्वतःचा वेळ वाचतो आणि आपण अधिक परिणामकारक बनतो. परंतु त्या कामाचे श्रेय तुम्ही घेतले पाहिजे जसे कि साऱ्या मेहनतीवर,श्रमावर तुमचेच हात आहेत .

सूत्र ८ : लोकांना , प्रतिस्पर्ध्यांना तुमच्याकडे येऊ द्या . आवश्यक असल्यास आमिष दाखवा.
तुम्ही स्वतः लोकांपर्यंत जाऊ नका , लोकांना आपल्या पर्यंत येण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. दुसऱ्यांकडून कामे करवून घेऊन तुम्ही नियंत्रण तुमच्या हाती घेता. तुम्हाला कळसूत्रीची बाहुली चालवणाऱ्यासारखे निष्णात बनले पाहिजे. पत्ते नेहमी तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे .
क्रमश:

189 

Share


Aarya
Written by
Aarya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad