मित्रांनो आज आपण कोणत्याही गोष्टी मोजायच्या झाल्या तर त्या किलो,ग्रॅम,टन,क्विंटल,लिटर,मिलीलिटर ह्या संज्ञेचा वापर करतो. पण ह्या सगळ्या नवीन पद्धती किंवा जास्तीत जास्त ५० ते ७० वर्ष जुन्या पद्धती. पण तुम्हाला माहिती आहे का कि आपण भारतीय फार पूर्वीपासून काही पद्धती वापरायचो. काही माहिती आहे तुम्हाला? चला नसल आठवत तर पायली,आडसरी,शेर,मापट,चिपट,कोळव,निळव नाही तर किमान चिळव तरी? नाही ना. बरोबर तंत्रज्ञान किंवा विकसित पद्धती वापरायच्या नादात आपण जुन्या पद्धती विसरत चाललोय.
तर चला मग थोड जाणुन घेऊ ह्या पद्धतीविषयी.
१) पायली म्हणजे चार शेर म्हणजे सात किलो
२) अर्धा पायली ( आडसरी ) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो
३) एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो
४) मापट म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो
५) चिपट म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो
(५०० ग्राम)
६) कोळव म्हणजे पाव किलो (२५० ग्राम )
७) निळव म्हणजे आतपाव ( १२५ ग्राम )
८) चिळव म्हणजे छटाक (५० ग्राम )
ही जुनी मापने मोजण्याची पद्धत.
काय मग परत चालू करायची हि माप?
शब्दांकन
किरण सरजिने