Bluepad | Bluepad
Bluepad
एक तरुणी...
Om
Om
5th Aug, 2022

Share

तरुणी, रस्त्याच्या नजीकच उभी होती.
आणि ओठांवर साखर ठेवून बोलत होती, असा माझा भास असावा , पण ती एक तरुणी होती.
डोळ्यात तिच्या वेगळीच संकल्पना रेखाटली होती, पण तिझ्या त्या कपाळावरच्या टिकलीने माझ्यासारख्या कित्येक तरुणांची मन मात्र जिंकली होती.
पण टिकली मात्र सुबक व छान होती, तिच्या चेहऱ्याची दिशा बदलवणारी होती,
त्या छोट्याश्या टिकलीने चेहऱ्याला एक सुंदर उपमा दिली होती.
पाऊस यावा आणि तरीही बघत राहावं एवढं ही न समजावं मला, तिची नजर माझ्याकडे वळताच,तिच्या डोळ्याची पापणी खाली पडली होती .
मी तिच्या समोर उभा होतो, ती माझ्या समोर उभी होती .
एवढं ते बारीक निरीक्षण माझं , मनात साठवून ठेवण्याची ओढ लागली होती.
पण, ती एक तरुणी फारच सुंदर दिसत होती....
तिला पाहताच मनात एक खंत उभी राहत होती, तिने मला एकदा तरी बघावं एवढीच माझी व्यथा होती...
म्हणजे कस तिला बघावं आणि फक्त बघतच राहावं एवढं सुंदर रूप पहावं याची मनाला ओढ लागली होती....
पण, काही म्हणा ती तरुणी फारच सुंदर होती....
स्वभाव तिचा माहीत नाही कसा असेल , पण तिला पाहून मनात वेगवेगळ्या प्रकारे तिच्या स्वभावाची चर्चा मात्र रंगत होती...
साधं- सुध रूप किती सुंदर असतं याच उदाहरण ती देत होती...
कितीही काय केलं तर साधं सरळ राहनच किती सुंदर असत हे ती दाखवत होती...
पण, काही म्हणा ती तरुणी फारच सुंदर होती.....
क्षणभरही न विसर पडावा अस हे तीच रूप होत.चेहऱ्यापेक्षा मन किती साफ असेल याचा विचार मनात येत होता.
तिच्या चेहऱ्यावरच्या त्या नाजूक छटा पाहून माझ्या चेऱ्यावर गोड smile तयार होत होती....
पण, काही म्हणा ती तरुणी फारच सुंदर होती ...
एक तरुणी...
.
नंतर ती माझ्याकडे पाहू लागली अस मनाला चाहूल लागली,खरच ती माझ्याकडे पाहू लागली...
इकडे स्वतःला आवरण्यात गडबड माझी सुरू झाली, बघता बघता ती समोरून चालत यायला लागली...
मी पाहतोय तिच्याकडे तेवढ्यात माझ्या पाठीमागून कोणीतरी येऊन तिला मिठी मारली.....
मग लक्षात आलं ती कोणाची तरी प्रियसी होती...
पण , काही म्हणा ती तरुणी फारच सुंदर होती...
माझं मन थोडं उदास झालं होतं, त्या कल्पनेच रूप ढासळून खाली पडल होत, शेवट झाला माझ्या स्वप्नांचा , पाऊस पडला त्या कल्पनेवर्ती स्वप्न नाहीशी झाली...
पण, काही म्हणा ती तरुणी फारच सुंदर होती......
... क्षणभंगुर

183 

Share


Om
Written by
Om

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad