लग्नासाठी मुलगी 👩 पहायला जाताय ?
मनात गोंधळ , टेन्शन आहे ? 👨
की मुलीशी नेमके काय बोलावे ? तिला नेमके काय सांगावे जेणेकरून तीचे मन जिंकता येईल ? असे प्रश्न पडले असतील तर हा लेख नक्की तुमच्या साठीच आहे .
खरे सांगायचे झाले तर लग्नासाठी पहायला मुलगा येणार आहे म्हंटल्यावर मुलींना तसे टेन्शन येते तसे मुलांच्या मनातही तनाव हा असतोच. पण अशा वेळी कुणाशी बोलावे आपल्या शंकांचे निरसन कुणाकडून करावे हा एक यक्ष प्रश्नच असतो. कारण मुलींसारखे ते इतरांशी सहज व्यक्त होऊ शकत नाहीत. आपल्या समाजाची जडण घडण च तशी आहे .त्याला आपण तरी काय करणार ? तेंव्हा काही महत्वाचे मुद्दे असे
1 . आवर्जून वेळ मागून घ्या.
आपल्या इथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमा मध्ये मुला मुलींना बोलण्याची फार कमी संधी दिली जाते. साऱ्या गोष्टी वडीलधारी मंडळीच ठरवतात. पण बदलत्या कळानुसार आपण आवर्जून मुली शी एकांतात बोलण्यासाठी थोडा वेळ मागून घ्यावा. शेवटी प्रश्न तुमच्या दोघांच्या ही संपूर्ण आयुष्याचा आहे. तिला तुमच्याशी किंवा तुम्हाला तिच्याशी काही खास बोलायचे असेल तर त्या गोष्टी तुम्ही सर्वांसमोर बोलू शकत नाही. काही अति महत्वाच्या गोष्टी आधीच स्पष्ट झालेल्या बऱ्या असतात. काही गोष्टी नंतर तिऱ्हाईत व्यक्ती कडून कळाल्याने नात्यात अंतर निर्माण होण्यापेक्षा आधीच स्वतः हून स्पष्ट सांगितलेल्या बऱ्या. त्यामुळे नात्यात विश्वास निर्माण होतो. आणि विश्वास हा तर नात्याचा आत्मा. तर त्यासाठी थोडे धाडस करून मोठ्या माणसानकडून वेळ आवर्जून मागून घ्या.
2 . स्वतःची अगदी थोडक्यात ओळख करून द्या.
वेळ जेंव्हा दिला जाईल तेंव्हा एक गोष्ट पक्की ध्यानात घ्या की फार फार तर 10 ते 15 मिनिटेच तुम्हाला दिली जातील. वेळ खूपच मर्यादीत आहे तेंव्हा त्यातील एक न एक मिनिट उपयोगात आणायचा आहे. गरजेच्या नसलेल्या आणि विषयाशी संबंधित नसलेल्या गोष्टींमध्ये वेळ अजिबात वाया घालवायचा नाही.
मुलीला सर्वात आधी तुम्ही कुठल्या कॉलेज मध्ये शिकलात. कोणते शिक्षण पूर्ण केलेत हे सांगा. तुम्ही कधी पासून नोकरी ,व्यवसाय जे असेल ते करताय ते सांगा. नोकरीत तुम्ही सध्या कोणत्या पदावर आहात हे सांगा. जर तुम्ही नोकरीत नवीन असाल उच्च पदावर नसाल किंवा व्यवसायाची नुकतीच सुरुवात केली असेल तर टेन्शन घेऊ नका येणाऱ्या काळात लवकरच तुम्ही प्रमोशन होऊन पुढे जाणार आहात किंवा व्यवसायात प्रगती करण्याच्या तुम्हाला संधी आहेत हे आवर्जून सांगा. त्यामुळे आज आर्थिक स्तिथी तितकी चांगली नसली तरीही तिची भविष्याची काळजी मिटेल ( टिप : हे सांगत असताना जे खरे आहे तेच सांगा .उगाच खोट्या आशा दाखवू नका .नंतर दोघांनाही त्याचा पश्च्याताप होईल .)
3 . स्वतःच्या aim बद्दल बोला.
लक्षात घ्या स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांच्या पाशी काही मजबूत aim (ध्येय) आहेत. दिशाहीन पुरुष ,उगाचाच भरकटलेले पुरुष त्यांना अजिबात आवडत नाहीत.कारण अशा दिशाहीन लोकांना कोणतेही भवितव्य नसते. तुमच्या आयुष्याचे जे काही सर्वात मोठे आर्थिक aim आहे हे तिला सांगा.त्यामुळे तिला भविष्याची आर्थिक security ची कोनतिहि। काळजी वाटणार नाही. सांगताना काळजी घ्या उगाच आवास्तव गोष्टी सांगू नका . पटतील अशाच गोष्टी सांगा. हा उगाच्च फेकूगिरी करतोय असे नको वाटायला.
4 . तिच्या स्वप्नाबद्दल बोला.
संवाद एकतर्फी नको व्हायला.तिला ही तिचे aim किंवा स्वप्न विचारा ( आजकालाच्या मुली शिकल्या सवरलेल्या आहेत त्यांना स्वतःची स्वप्ने असतात.) तेंव्हा तुम्ही तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत नक्की कराल असे खात्रीपूर्वक सांगा ( जेंव्हा खरेच मदत करायची वेळ येईल तेंव्हा मनापासुन मदत करा कारण तुमच्या शब्दावर ती तुमच्या सोबत यायला तयार झाली आहे हे लक्षात ठेवा.)
तुम्ही तिला तिच्या स्वप्नाच्या पूर्तते साठी मदत कराल असे सांगितल्यावर 100% तिचा तुमच्या बद्दल positive aproch वाढेल यात शंकाच नाही.
5. घराकामात मदत करण्याचे आश्वासन द्या.
तुम्ही जर नोकरी करणाऱ्या मुलीच्या शोधात असाल तर तिला घराकामात मदत करण्याची मनाची तयारी ठेवा.तिच्याकडून घर चालवण्या साठी जर पैशांची अपेक्षा ठेवत असाल तर तीने ही तुमच्या कडून घरकामात मदतीची अपेक्षा ठेवणे अजिबात गैर नाही.तुम्ही
प्रत्येक कामात मदत करू शकत नसाल तरीही जमेल त्या कामात शक्य ती मदत करण्याचे पक्के आश्वासन द्या. त्यामुळे तिच्या मनातील एक मोठे टेन्शन दूर होईल. ( हो पण लग्नानंतर हे आश्वासन राजकीय आश्वासांना सारखे विसरून जाऊ नका. ते जरूर पाळा.याताच दोघां चे भले आहे.)
6. घराच्यांच्या स्वभावा विषयी माहिती देताना ....
इथे मात्र तुम्ही स्वतःहून तिला काही सांगायचे नाही. ( शेवटी कसे आहे आपण आपल्या घरच्या माणसांबद्दल ,त्यांच्या स्वभावाबद्दल ,घरच्या वा वातावरणाबद्दल कधीही चांगलेच बोलणार हे तिला ही माहीत आहेच.) तेंव्हा आमच्या घरचे लोक , वातवरण याबद्दल तु स्वतः तुझ्या विश्वासातल्या व्यक्ती जवळ चौकशी कर असे कॉन्फिडन्टॅली सांगावे. लगेंच ती चौकशी करेलच असे नाही . तुमच्या इतक्या कॉन्फिडन्टली सांगण्याने च तुम्ही तिचे मन जिंकाल तिची एक मोठ्ठी काळजी मिटवाल.
6. आवडी निवडी विषयी..
मुली ना त्यांच्या आवडी निवडी प्राणासारख्या प्याऱ्या असतात . त्या मुलांपेक्षा अधिक स्वन्सेटिव्ह असतात.त्यामुळे कोणतीही आवड जपताना
मनापासुन जपतात. त्या त्यांना आत्यान्तिक प्रिय असतात.
तिला जर लेखन ,वाचन ,गायन ,नृत्य ,चित्रकारिता वा कोणतीही आवड असेल तर तुम्ही ही तुम्हाला ज्यात आवड आहे ते खरे खरे सांगा. एका कला काराला दुसऱ्या कलाकारा विषयी आपलेपणा वाटतो. तुमची बाजू अधिक पक्की होते.
तिच्या घरी एखादे पाळीव कुत्रे किंवा मांजर असेल तर आपण आपल्या घरीही एखादे कुत्रे ,मांजर पाळू शकू असेही तिला सांगा. तुम्हा मुलांना ही गोष्ट हास्यास्पद किंवा फालतू वाटेल् पण लक्षात घ्या या मुलींचे त्यांच्या घरच्या पाळीव प्राण्यावर प्रचंड प्रेम असते. तुम्ही तिच्यासाठी इतके ऍडजेस्ट होताय हे पाहूनच ती विरघळेल. 🍧🍧🍧
7. फिरायला जायचे आश्वासन द्या.
सर्वसाधारण पणे मुली लग्नापूर्वी शालेय किंवा कॉलेज च्या सहली शिवाय फारश्या फिरलेल्या नसतात. फिरायची हौस शंभरातल्या नवव्यांनांव स्त्रियाना असतेच.
अशा वेळी तुम्ही स्वतः आज पर्यंत कुठे कुठे फिरलात हे तिला अगदी थोडक्यात सांगा .लग्नानंतर आपण दोघे मिळून खूप फिरू हे सांगण्या पेक्षा माझी ही hobby मी इथून पुढेही चालू ठेवणार आहे हे सांगायला विसरू नका.तिला जे समजायचे ते समजेल ती.😊 महत्वाचे म्हणजे दिलेले आश्वासन पाळा.🚉🚈🚝
8. तणाव चेहऱ्यावर येऊ देऊ नका.
अगदीच जे पहिल्या दुसऱ्या वेळी मुलगी पहायला निघालेत अशा ( लग्नाळू) मुलांच्या मनात तणावं टेन्शन ,दबाव असणे सहाजिक आहे.पण तुम्ही तुमचे टेन्शन चेहऱ्यावर येऊ देऊ नका.ते मनातच ठेवा. थोडे कंट्रोल ठेवा. चेहरा कॉन्फिडन्ट दिसू दे. तो तुमचे निम्मे काम हलके करेल. फार पूर्वीच्या काळात स्त्रियाना शरीराने मजबूत पुरुष हवा असायचा कारण जंगलामध्ये तो तिचे रक्षण करू शकेल आणि शिकार करू शकेल.आज त्या गोष्टी कालबाह्य झाल्या. आजच्या स्त्री ला मानसिक रित्या खंबीर (imotionally strong) पुरुष हवा असतो ,कारण पुढील आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगी हे त्याचे strong असणेच तिच्या कामी येणार असते. तेंव्हा look confident. चेहऱ्यावर तणावं ,गोंधळ लेले पण दिसू देऊ नका .जरी ते मनात असले तरीही.
अशा प्रकारे तिच्याशी आर्थिक सुरक्षा ( economical safty) , भविष्याचे नियोजन ( future प्लॅन) , कौटुंबिक सुरक्षा , भावनिक सुरक्षा ( imotional saftey) अशा मुद्द्यानावर आटोपशीर बोलून तिचा विश्वास तुम्ही सहजतेने जिंकू शकता. विश्वास जिंकणेच तर महत्वाचे आहे.एकदा तुम्ही तिचा विश्वास जिंकला की ती तुम्हाला ' हो ' म्हंटल्या शिवाय राहणार नाही. आणि मग तुमचा ' हो ' पासून् सुरु झालेला प्रवास ' अहो ' पर्यंत नक्की पोहचेल .
आणि मग ? मग काय मग ?
मग ' नांदा सौख्यभरे .' ' वाजो आनंदाचे चौघडे '.
लेखकाचे मनोगत : या टिप्स चा वापर केल्याने जर कोणाचे लग्न ठरले तर कृपया मला या लेखाखाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट ची मी मनापासुन वाट पाहीन. तोपर्यंत 🙏🙏😊.